मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील कोरोना योद्ध्यांना दुबईस्थित मसालाकिंग धनंजय दातार यांच्याकडून हापूसची भेट


प्रतिनिधी

पुणे : कोविड विषाणूच्या प्रादुर्भावाने मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील दीडशेहून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा गौरव नुकताच अनोख्या पद्धतीने झाला.Hapus Mango Presented by Masalaking Dhananjay Datar to Corona Warriors of Pune

दुबईस्थित ‘अल अदिल’ समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी या करोना योद्ध्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी त्यांना हापूस आंब्याच्या पेट्यांची भेट पाठवली. तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून स्वदेश सेवा फाऊंडेशनच्या संस्थापक धनश्री पाटील यांच्या माध्यमातून या सर्व करोना योद्ध्यांचा सत्कारही केला.



पुणे शहर, परिसर व आसपासच्या तालुक्यांत करोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे हिंदू व मुस्लिम स्वयंसेवक प्रामुख्याने मूलनिवासी मुस्लिम मंच (येरवडा), कैलास स्मशानभूमी कामगार गट, उम्मत संस्था व वैकुंठ स्मशानभूमीतील स्वरुपवर्धिनीचा गट यांच्या माध्यमातून अविरत सेवा देत आहेत.

कोरोना साथीच्या काळात आरोग्यसेवा आणि आपत्कालीन सेवा देणाऱ्या अन्य घटकांचे कौतुक झाले, परंतु अनेक अडचणी सहन करत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या अंत्यसंस्कार स्वयंसेवकांच्या वाट्याला साधी प्रशंसाही आली नव्हती.

या लोकांचा उचित गौरव व्हावा या हेतूने धनश्री पाटील यांनी दुबईस्थित डॉ. दातार यांच्याशी संपर्क साधला. समाजसेवेची आवड असणाऱ्या डॉ. दातार यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला.

सध्याच्या स्थितीत पुण्यात प्रत्यक्ष येणे शक्य नसल्याने डॉ. दातार यांनी या स्वयंसेवकांसाठी कोकणातून हापूस आंब्याच्या पेट्या मागवून घेतल्या व त्यांचे वितरण हे स्वयंसेवक काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन करण्यात आले. याकामी सबीर शेख, ललित जाधव, जावेद खान, अविनाश धायरकर यांचे सहकार्य लाभले.

या अनोख्या उपक्रमाविषयी धनश्री पाटील म्हणाल्या, “कोरोनाबाधित मृतदेहांवर एकही रुपया न घेता अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांचे काम व योगदान समाजापुढे येणे गरजेचे आहे.

या योद्ध्यांनाही त्यांचा प्रथमच कुणीतरी सत्कार करत असल्याचे पाहून खूप आनंद झाला. हे स्वयंसेवक जात-धर्म न पाहता सर्व मृतदेहांवर त्यांच्या त्यांच्या धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्काराचे काम बांधीलकीने व आत्मीयतेने करतात. रुग्णालयांतील बेवारस मृतदेहांवरही ते अंत्यसंस्कार करतात.

डॉ. दातार यांनी पाठवलेल्या भेटीने तसेच सत्काराने त्यांनाही आपलेसे वाटले.”कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करताना येणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकताना कैलास स्मशानभूमी कामगार गटाचे ललित जाधव म्हणाले, की गेले वर्षभर आम्ही रात्रंदिवस या कामात व्यग्र आहोत,

परंतु सध्याच्या साथीची लाट तीव्र असल्याने स्मशानभूमीत येणाऱ्या कोरोनाबाधित मृतदेहांची संख्या रोज वाढत आहे. आमच्यावरही कामाचा खूप ताण येत आहे. सतत पीपीई किट घालून सज्ज राहणे, मृतदेहांवर विनाविलंब अंत्यसंस्कार करणे,

स्वतःलाही सुरक्षित राखणे हे आव्हान आहे. आमच्या कामातील अडचणी समजून घेऊन सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे.

यासंदर्भात डॉ. धनंजय दातार म्हणाले की, कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवकांच्या धैर्याला आणि सेवासमर्पिततेला तोड नाही. कोरोना शब्द उच्चारताच लोक घाबरतात आणि लांब राहतात,

परंतु हे स्वयंसेवक मात्र जीव धोक्यात घालून रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. हे थोर काम आहे. मी या उपक्रमात फार काही मोठे केलेले नाही. पुण्यातील करोना योद्ध्यांच्या जीवनात थोडा गोडवा आणला इतकेच.

Hapus Mango Presented by Masalaking Dhananjay Datar to Corona Warriors of Pune

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात