Maharashtra Corona Updates : २४ तासांत राज्यात ९०० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू, रुग्णसंख्याही पुन्हा वाढली

Maharashtra Corona Updates : more than 900 deaths in In 24 hours, Read Details

Maharashtra Corona Updates : महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाच्या 57,640 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 920 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मागच्या 24 तासांत 57,006 जण बरेही झाले आहेत. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 48,80,542 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 72662 वर गेला आहे. Maharashtra Corona Updates : more than 900 deaths in In 24 hours, Read Details


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात 24 तासांत कोरोनाच्या 57,640 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 920 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात मागच्या 24 तासांत 57,006 जण बरेही झाले आहेत. राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 48,80,542 वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 72662 वर गेला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात राज्यात 2,79,200 चाचण्या घेण्यात आल्या. यासह राज्यात आतापर्यंत 2,83,84,582 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याचबरोबर पुन्हा एकदा मुंबईत 4 हजारांच्या जवळ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासांत 3882 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 77 जणांचा मृत्यू झाला.

औरंगाबादेत 981 नवीन रुग्ण

औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाचे 981 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,27,958 वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्ह्यात संसर्गामुळे आणखी 43 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 2631 वर गेली. आतापर्यंत औरंगाबादेतील 1,15,535 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Maharashtra Corona Updates : more than 900 deaths in In 24 hours, Read Details

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात