विशेष प्रतिनिधी
मुंबई : विलीनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर एसटी कर्मचारी ठाम असल्याने महामंडळाने कारवाईची धार तेज केली आहे. निलंबित एसटी कर्मचाऱ्यांची संख्या आता २४७९ झाली आहे. त्याशिवाय कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सेवामुक्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. Govt. ristricates 2479 ST workers till today
उच्च न्यायालयाने संप प्रकरणावर सुनावणीसाठी २२ नोव्हेंबर तारीख दिली आहे. त्यामुळे संपकऱ्यांनीसुद्धा २२ पर्यंत पुन्हा वाट बघण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यभरात १४४ बस धावल्या असून, त्यातून ३५१८ प्रवाशांनी प्रवास केला. त्यासाठी साधी बस, शिवनेरी आणि शिवशाही एसटी रस्त्यावर धावत असल्याचे महामंडळाने सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App