खंडणी प्रकरणात पिंपरी-चिंचवडचा माजी उपमहापौर अटकेत; भाजपचा सलग दुसरा नगरसेवक जाळ्यात


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड बाजारपेठेतील दुकानदारांकडून खंडणी गोळा करण्याच्या आरोपाखाली भाजपाचा नगरसेवक केशव घोळवे याच्यासह तिघांना पिंपरी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. घोळवे पिंपरी चिंचवडचा माजी उपमहापौर सुध्दा आहे. घोळवे याने व्यापाऱ्यांना गाळे मिळवून देण्यासाठी 55 हजारांची खंडणी घेतली. इतकेच नव्हे तर पुन्हा फिर्यादीकडे 1 लाख रुपयांची मागणी केली. स्थायी समिती अध्यक्षासह आता आणखी एक भाजप नगरसेवक पोलीस जाळ्यात सापडला. Former Deputy Mayor of Pimpri-Chinchwad arrested; BJP’s second consecutive corporator In the net



राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांचे नाव पुढे करत पैसे गोळा होत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी त्याबाबत आसवाणी यांना जाब विचारला. त्यांनी पोलिसांना लेखी तक्रार केली.

त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू होऊन पिंपरी पोलिसांनी भाजप नगरसेवक केशव घोळवे, गुड्डू यादव यांच्यासह तिघांना अटक केली. खंडणी प्रकरण काही लाखांचे असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या तपासाअंती खंडणीचा खरा आकडा समोर येणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

Former Deputy Mayor of Pimpri-Chinchwad arrested; BJP’s second consecutive corporator In the net

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात