”देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं”, राज ठाकरेंचं विधान!

Raj-Thackeray-10

‘’प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे…’’, असंही म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ट्वीटद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी जंगलं टिकवायला हवीत, मुलांना जंगलांची ओळख करून द्यायला हवी, असे आवाहन केले. Environment friendly politics should be done in the country Raj Thackerays statement

राज ठाकरे म्हणतात, ‘’जसं चित्रपट हा सर्व कलांचा संगम समजला जातो तसं जंगल हे सर्व नैसर्गिक घटकांचा संगम आहे. कोरोना काळात मी एका मुलाखतीत ऐकलं होतं की मानव जात नष्ट झाली तर निसर्ग साखळीवर काहीही परिणाम होणार नाही पण साधी मधमाशी जर ह्या पृथ्वीवरून नामशेष झाली तर अख्खी निसर्ग साखळी डिस्टर्ब होईल. त्यामुळे प्रत्येक निसर्ग घटकांची निर्व्याज जोपासना करणारी जंगलं हवीतच.’’

याचबरोबर  ‘’जर काही पुढच्या पिढ्यांसाठी ठेवून जायचं असेल तर जंगलं टिकवायला हवीत, बोटॅनिकल गार्डन्स जागोजागी उभारायला हवीत, प्रत्येक झाड तोडताना हात थरथरला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शालेय जीवनापासून मुलांना जंगलं दाखवायला हवीत, तो अनुभव त्यांचे विचार बदलेल. देशात पर्यावरणपूरक राजकारण व्हायला हवं.’’ असंही राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

Environment friendly politics should be done in the country Raj Thackerays statement

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात