प्रतिनिधी
नांदेड – शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्यांना महत्त्व देण्याची गरज नाही, असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीने आपले दरवाजे बंद करून घेतले. आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही, असे सूचक वक्तव्य केले. शरद पवार, एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी भेट घेतल्यानंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या खळबळीनंतर त्यांनी नांदेडमध्ये मातोश्रीसंबंधी वक्तव्य करून त्यात आणखी भर घातली. devendra fadanavis targets sanjay raut, but fevours Matoshree
फडणवीस म्हणाले, की मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले आहेत, आम्ही मातोश्रीवर जाणे बंद केलेले नाही’ अशा शब्दांत फडणवीसांनी राजकारणाला नवे वळण दिले. त्याआधी परभणी येथे बोलताना संजय राऊत यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले होते. संजय राऊत हे काही सामनाचे संपादक नाहीत. वहिनी म्हणजे रश्मी ठाकरे या सामनाच्या संपादिका आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.
फड़णवीस सिल्वर ओकवर गेले होते. एकनाथ ख़डसेंकडे गेले. ते मातोश्रीवर देखील येतील, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संजय राऊत काय म्हणाले ते मी ऐकले आहे. सध्या जी राजकीय स्थिती आहे ते पाहता राऊतांनी एकप्रकारे आमंत्रणच दिले आहे. हे आमंत्रण आम्ही स्वीकारले आहे, असे विधान शेलार यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App