ना चाचण्यांची माहिती, डाटाही दिला नाही, तरी पाकिस्तानने आणली कोरोना प्रतिबंधक पाकवॅक लस


पाकिस्तानने चक्क कोरोना प्रतिबंधक लस आणली आहे मात्र त्यासाठी चाचण्या केल्या की नाही हे सांगितले नाही, डाटाही दिला नाही. तरीही पाकवॅक नावाने ही लस बाजारात आणली आहे. कोरोना विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे, हे देखील सांगण्यात आलेले नाही.No test , no data provided, but Pakistan brings corona preventive Pakvac vaccine


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानने चक्क कोरोना प्रतिबंधक लस आणली आहे मात्र त्यासाठी चाचण्या केल्या की नाही हे सांगितले नाही, डाटाही दिला नाही. तरीही पाकवॅक नावाने ही लस बाजारात आणली आहे.

कोरोना विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे, हे देखील सांगण्यात आलेले नाही.भारताने स्वदेशी कोरोना लस विकसित केल्यापासूनच पाकिस्तानची पोटदुखी सुरू होती.



त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानमध्ये बनविलेली लस बाजारात आणायचीच असे ठरविण्यात आले होते. त्याप्रमाणे पाकिस्तानने ही लस बाजारात आणली आहे.

पण ही लस कोरोना विषाणू विरोधात नेमकी किती प्रभावी आहे? किती जणांवर याची चाचणी घेण्यात आलीय? चाचण्याचा नेमका परिणाम काय आहे? याबाबतची कोणतीही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

पाकिस्तानच्या राष्ट्रीय कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी पाकवॅक लस लॉन्च केली आहे. पाकिस्तान लवकरच कोरोनावरील महत्वपूर्ण औषध तयार करण्यासाठी सक्षम होणार आहे, असा दावा केला आहे.

उमर म्हणाले, कोरोना विरोधी स्वदेशी लस तयार करण्याचं संपूर्ण श्रेय राष्ट्रीय आरोग्य संस्थेला जाते. कोरोना प्रादुभार्वाच्या काळात चीननं पाकिस्तानसोबतची मैत्री निभावली आहे.

याआधीपासूनच पाकिस्तान आणि चीनचे मैत्रीचं संबंध राहिले आहेत आणि कोरोना काळात चीननं भरीव मदत करुन ते सिद्धही करुन दाखवलं आहे. पाकिस्तान सरकार जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात

येणार्‍या ईद-उल-अजहाच्या (बकरी ईद) पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागू नये यासाठी लसीकरणात वेग आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

No test , no data provided, but Pakistan brings corona preventive Pakvac vaccine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात