अफगाणिस्तानमधील शांततेसाठी आता भारत व पाकिस्ताननेच पुढे यावे, अमेरिकेने घातली गळ


विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानात स्थैर्य निर्माण होण्याचा खरा फायदा भारत, पाकिस्तान, रशिया, चीन आणि तुर्कस्तान या देशांना अधिक असल्याने या शेजारी देशांनी संघर्षग्रस्त अफगाणिस्तानमधील शांततेसाठी अधिक प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज केले. India, Pakistan come forward for afganistan

ते म्हणाले,‘‘अफगाणिस्तानमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी अधिक सहकार्य करण्याचे आम्ही इतर देशांना आवाहन करत आहोत. सैन्यमाघारीबाबत बायडेन यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ‘ओसामा बिन लादेनला मारणे आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थाने नष्ट करणे, या दोन कारणांसाठी आम्ही अफगाणिस्तानात गेलो होतो.आमच्यावर हल्ला झाला होता. हल्ला करणाऱ्यांना मारण्यास आम्ही गेलो होतो. आमचे उद्दिष्ट पूर्ण झाले. हे युद्ध पिढ्यानुपिढ्या चालावे, अशी आमची कधीही योजना नव्हती. अफगाणिस्तानमध्ये राजकीय स्थैर्य निर्माण करणे, हे आमचे काम कधीच नव्हते.

आता तालिबानबरोबर लढत बसण्यापेक्षा आमच्या देशासमोर असलेल्या प्रश्नांचा सामना करणे आम्हाला अधिक आवश्याक वाटते. आम्ही जगभरात पसरलेले दहशतवादाचे जाळे नष्ट करण्यासाठी काम करू,’ असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

India, Pakistan come forward for afganistan


इतर बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण