पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीमध्ये बदल; आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी कव्हर फायरिंग; भारताचेही नव्या स्ट्रॅटेजीने प्रत्युत्तर


वृत्तसंस्था

श्रीनगर – पाकिस्तानच्या मॉडस ऑपरेंडीत काहीसा बदल जाणवतो आहे. आता दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या निमित्ताने ते शस्त्रसंधी तोडून ते गोळीबार करतात. ते पाकिस्तानी दहशतवाद्यांना घुसविण्यापेक्षा स्थानिक दहशतवाद्यांना हल्ले करण्यासाठी उचकवत आहेत, असे चिनार कॉपर्स कमांडर लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी स्पष्ट केले आहे. The number of (terror) incidents are on decline, they’re virtually half, as compared to last year

पाकिस्तानच्या विनंतीनुसार भारताने दोन महिन्यांपूर्वी शस्त्र संधी अमलात आणली. पण पाकिस्तानचा सीमेपलिकडून गोळीबाराच्या घटना सुरूच आहेत. त्यामध्ये थोडा बदल झाला आहे. आता फक्त दहशतवाद्यांना घुसखोरीच्या निमित्ताने ते कव्हर फायरिंग करतात. इकडून प्रत्युत्तर मिळाले की माघार घेतात. एकूण गोळीबाराच्या घटनांमध्ये ५० टक्के घट झाली आहे, असे जनरल पांडे यांनी सांगितले.



याचा अर्थ पाकिस्तानची मूळ मनोवृत्ती बदलली असल्याचे आम्ही मानत नाही. तिथल्या दहशतवादाशी संबंधित घडामोडी कमी झाल्याचेही आम्ही मानत नाही. सीमेवरील गस्त आणि बंदोबस्त यांच्यातही आपल्या बाजूने काही कमी केलेले नाही. उलट पाकिस्तानी लष्कराच्या बदललेल्या मॉडस ऑपरेंडीचा अभ्यास करून नवी स्ट्रॅटेजी ठरवता येते, याकडे जनरल पांडे यांनी लक्ष वेधले.

स्थानिक काश्मीरी युवकांना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतविण्याला पाकिस्तानी लष्कर प्राधान्य देत असल्याचे गेल्या वर्षभरात दिसले आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैनिक किंवा दहशतावाही मरणार नाहीत किंवा कमी मरतील, असा त्यांचा होरा आहे. पण भारतीय लष्कराच्या तो लक्षात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला सडेतोड किंबहुना त्याही पेक्षा जास्त खणखणीत प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही जनरल पांडे यांनी दिला आहे.

The number of (terror) incidents are on decline, they’re virtually half, as compared to last year


इतर बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात