काश्मीरमधील तरुणांसाठी आशेचा किरण, भारतीय लष्कराने तरुणांना कौशल्याधारित शिक्षण देण्यासाठी सुरू केला हिमायत कार्यक्रम, १२ तरुणांना केले प्रशिक्षण पूर्ण


काश्मीरमधील धुमसत्या बर्फात येथील तरुणांसाठी आशेचा किरण दिसत आहे. भारतीय लष्कराने येथील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण (स्किल डेव्हलपमेंट) शिक्षण देण्यासाठी प्रोजेक्ट हिमायत हा कार्यक्रम सुरू केला आहे. काश्मीरमधील १२ तरुणांना प्रशिक्षणासाठी जम्मूला पाठविण्यात आले आहे.ray of hope for the youth of Kashmir, Indian Army launches advocacy program to impart skill based education to youth, completes training for 12 youth


विशेष प्रतिनिधी 

पूंछ : काश्मीरमधील धुमसत्या बर्फात येथील तरुणांसाठी आशेचा किरण दिसत आहे. भारतीय लष्कराने येथील तरुणांना कौशल्याधारित शिक्षण (स्किल डेव्हलपमेंट) शिक्षण देण्यासाठी प्रोजेक्ट हिमायत हा कार्यक्रम सुरू केला आहे. काश्मीरमधील १२ तरुणांना प्रशिक्षणासाठी जम्मूला पाठविण्यात आले आहे.

काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर येथील जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. मुकेश पठाणिया हा काश्मीरी युवक या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. मुकेशम्हणाला, भारतीय लष्कराने सुरू केलेला हा कार्यक्रम काश्मीरमधील बेरोजगार तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.आम्हाला प्रोजेक्ट हिमायतमध्ये स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देण्यात येतआहे. आम्हाला जम्मूमध्ये व्यक्तिमत्व विकास, स्किल ट्रेनींगसह कॉम्प्युटरचे बेसीक नॉलेज दिले जाणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी संभाषण कलाही शिकविली जाणार आहे.

भारतीय लष्कराने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे काश्मीरी युवकांना विविध प्रकारच्या कौशल्याचे शिक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर आमच्यासाठी नोकºयांची संधीही उपलब्ध करूद दिली जाणारआहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे.

त्यामुळे माझ्यासारखे तरुण आर्थिकदृष्टया स्वतंत्र होऊ शकणार आहेत.या उपक्रमात सहभागी झालेला मजीद खान हा तरुण म्हणाला, भारतीय लष्कराने आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. पूंछ हा काश्मीरमधील मागास भाग आहे.

आमच्यापैकी अनेक जणांना पूर्वी हिमायत नावाच्या कार्यक्रमाची माहितीही नव्हती. परंतु, लष्कराने आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. आमच्यासाठी होस्टेलची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही जम्मूमध्ये राहून प्रशिक्षण पूर्ण करू शकलो.

ray of hope for the youth of Kashmir, Indian Army launches advocacy program to impart skill based education to youth, completes training for 12 youth

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण