पाकिस्तानला अमेरिकेने जागा दाखविली, बायडेन यांनी इम्रान खान यांच्याशी बोलणेही टाळले

अमेरिकेच्या मदतीवर शिरजोर बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो बायडेन यांनी जागा दाखविली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांच्याशी बोलणेही टाळले. त्याचबरोबर हवामान बदलाविषयी होणाऱ्या परिषदेत पाकिस्तानला निमंत्रणही दिलेले नाही.The US showed Pakistan the place, Biden also avoided talking to Imran Khan


विशेष प्रतिनिधी 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मदतीवर शिरजोर बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचे नूतन अध्यक्ष जो बायडेन यांनी जागा दाखविली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष इम्रान खान यांच्याशी बोलणेही टाळले. त्याचबरोबर हवामान बदलाविषयी होणाऱ्या परिषदेत पाकिस्तानला निमंत्रणही दिलेले नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हवामान बदलासंबंधी होणाया ऑनलाईन संमेलनाचे पाकिस्तानला निमंत्रण दिलेले नाही. हे संमेलन २२ व २३ एप्रिल रोजी होईल. या वर्षाच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र हवामान बदल संमेलनाच्या आधी बायडेन यांचे विशेष दूत जॉन कॅरीदेखील याच मुद्द्यावर चचेर्साठी भारत, बांगलादेश आणि यूएईचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पाकिस्तानचे नाव समाविष्ट नाहीहा पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने चीनशी सलगी करत भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचे प्रयत्न वारंवार केले. यासाठी पाकिस्तानला चीनची फूस आहे. चीनने पाकिस्तानला विकास कामांच्या नावाखाली मोठा निधी दिला आहे.

काही भागात रस्त्यांसह इतर सुविधा तयार करून दिल्या. मात्र आता पाकला या गोष्टी जड जात आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला आता त्याची जागा दाखवायला सुरूवात केली आहे.अमेरिकेच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला. याच मुद्द्यावर पंतप्रधान इम्रान खान यांनी सोशल मीडियावर अमेरिकी प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

परिषदेला बोलावले नसल्याने इम्रान खान यांचा चांगलाच तिळपापड उडाला आहे. हवामान बदलातून निर्माण होणाºया समस्या कमी करण्यासाठी माझ्या सरकारने अनेक धोरणे तयार केली. भावी पिढ्यांच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत.

आम्ही जागतिक समस्येची तीव्रता कमी करणे, स्वच्छ व हरित पाकिस्तान करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणूनच ग्रीन पाकिस्तानसाठी पुढाकार, १० अब्ज वृक्षारोपण, नद्यांची स्वच्छता या क्षेत्रात गेल्या सात वर्षांत खूप काही अनुभव घेतला आहे.

आमच्या धोरणांचे कौतुक झाले. त्याला मान्यताही मिळाली. आम्ही या क्षेत्रात कोणत्याही देशाची मदत करण्यास तयार आहोत. आम्ही संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल संमेलन २०२१ साठी आधीपासूनच प्राधान्यक्रम निश्चित केला आहे, असे इम्रान यांनी म्हटले आहे.

The US showed Pakistan the place, Biden also avoided talking to Imran Khan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*