कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ठाकरे – पवार सरकारने लपवल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप


प्रतिनिधी

परभणी : संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या राज्य सरकारने लपविल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths

देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दुपारी परभणी शहराच्या दौ-यावर दाखल झाले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व अन्य वरिष्ठ अधिका-यांबरोबर चर्चा केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी हितगुज केले.राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या सरकारने लपविल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. पहिल्या आणि दुस-या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण दगावले.

ठकरे – पवार सरकारचे अपयशच त्यामागे कारणीभूत होते. परंतू सरकारने हे अपयश झाकण्याकरिता मृत्यूच्या संख्येचा आकडा लपविण्याचा प्रयत्न केला, असे नमुद केले.

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा नेमका आकडा कळाला पाहिजे. त्यासाठी आपण सरकारला जाब विचारू तसेच कोरोनाच्या या आपत्तीत सरकारने केलेल्या अक्षम्य अशा चुकाचाही शोध घेऊ, कोरोना अंतिम टप्प्यात आहे.

प्रादुर्भाव हळूहळू कमी होतो आहे. परंतु, या आपत्तीत साहित्य खरेदी असो, काळा बाजार असो, हितसंबंधी व्यक्तींना दिलेल्या कंत्राटांचे प्रकरण असो आदी बाबत चौकशीची मागणी केली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

devendra fadanavis allaged govt has hidden corona deaths

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी