Shortage Of Corona Vaccines : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केजरीवाल सरकारची लसींच्या कमतरतेवरून तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. हायकोर्टाने म्हटले की, जर दिल्ली सरकार भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत लोकांना पुरवू शकत नसेल तर त्यांनी वाजतगाजत एवढी लसीकरण केंद्रे उघडायला नको होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. Delhi HC Slams Kejriwal Govt on Shortage Of Corona Vaccines
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केजरीवाल सरकारची लसींच्या कमतरतेवरून तीव्र शब्दांत कानउघाडणी केली. हायकोर्टाने म्हटले की, जर दिल्ली सरकार भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चे दोन्ही डोस ठरलेल्या मुदतीत लोकांना पुरवू शकत नसेल तर त्यांनी वाजतगाजत एवढी लसीकरण केंद्रे उघडायला नको होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
न्यायाधीश रेखा पल्ली यांनी दिल्ली सरकारला नोटीस बजावली असून सहा आठवड्यांची मुदत संपण्यापूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस प्रदान करता येईल की नाही, हे स्पष्ट करण्यास सांगितले.
कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनचे इतर डोस राजधानी दिल्लीत उपलब्ध करून देण्यात यावेत, अशा आणखी दोन याचिकांच्या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाही नोटीसही बजावली आहे.
Delhi HC Slams Kejriwal Govt on Shortage Of Corona Vaccines
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App