मालमत्ता नोंदणीतून सरकारच्या खजिन्यामध्ये मार्चमध्ये ९ हजार कोटी; वर्षात ११ हजार कोटी


वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकारने मालमत्तेच्या नोंदणीतून एक वर्षांत जेवढा महसूल मिळविला नाही तेवढा या वर्षी मार्च -2021 या एका महिन्यात मिळविला आहे. मार्चमध्ये मालमत्ता नोंदणी मोठी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. याद्वारे सरकारला सुमारे 9 हजार कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. 9,000 Crore From Asset Registration to Government in March; 11 Thousand crore in Last Year

गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये सरकारला मालमत्तांच्या नोंदणीतून 11 हजार कोटी रुपयांचा महसुल प्राप्त झाला होता. त्याचा विचार करता यंदा एकट्या मार्च महिन्यात 9,066 कोटी रुपये नोंदणीतून सरकारला प्राप्त झाले आहेत. एका महिन्यात महसूल प्राप्त होण्याचा हा विक्रम ठरला आहे.2020 मध्ये सरकारला 11, 682 कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.

राज्यात मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात घर, मालमत्ता खरेदीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे खरेदीदार आणि विकसक यांनी त्यासाठी स्टॅम्प खरेदी करून करारही मार्च महिन्यात केल्याचे उघड होत आहे. दुसरीकडे स्टॅम्प शुल्कात सरकारने दिलेल्या सवलतीचा अनेकांनी फायदा उठविला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये स्टॅम्प शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता.सप्टेंबर 2020 आणि डिसेंबर 2020 अखेर 3 टक्के कपात केली होती. त्यांनतर जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान 2 टक्के कपात झाली होती.

एप्रिलमध्ये मालमत्ता खरेदी थंडावली

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2021 मध्ये सरकारने घर खरेदी करणाऱ्या महिलांसाठी स्टॅम्प शुल्कात 1 टक्के कपात करण्याची घोषणा केली. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट होत आहे. कारण एप्रिलमध्ये मालमत्ता नोंदणीतून सरकारला 1256 कोटींचा महसूल प्राप्त झाला. तो मार्चच्या तुलनेत 8 टक्के कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

9,000 Crore From Asset Registration to Government in March; 11 Thousand crore in Last Year

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण