पदोन्नतीतील आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन राऊतांवर भडकले


राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री नितीन राऊत यांनी प्रेस नोट द्वारे दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. नितीन राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोट सारखा कोणताही निर्णय झाला नसल्याची अजित पवारांच्या कार्यालयाने दिली. Deputy Chief Minister Ajit Pawar lashed out at Nitin Raut over reservation in promotion


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने पदोन्नतीतील आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री नितीन राऊत यांनी प्रेस नोट द्वारे दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले. नितीन राऊत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रेसनोट सारखा कोणताही निर्णय झाला नसल्याची अजित पवारांच्या कार्यालयाने दिली.

नितीन राऊत यांनी याबाबतची प्रेस नोट जारी केल्याने अजित पवार चांगलेच भडकले. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून सेवा जेष्ठतेप्रमाणे पदोन्नती देण्याबाबतच्या जीआरची अंमलबजावणीला स्थगिती देण्यात आलेली नाही. सेवाजेष्ठतेनुसारच पदोन्नती दिली जाणार आहे.



अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यामध्ये पदोन्नतीच्या मुद्द्यावरून संघर्ष दिसला. जीआरच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्याचे पत्र सादर करूनच नितीन राऊत यांनी बोलावे अशी भूमिका नाराज असलेल्या अजित पवारांनी घेतली. आज झालेल्या उपसमितीच्या बैठकीत पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती देण्यात आली आहे. 7 मे रोजी राज्य सरकारने जीआर जारी करत पदोन्नतीत आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या वरून आरक्षित वर्गात नाराजीचे सूर उमटले होते. याबाबत उपमुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत या जीआरची तूर्तास अमलबजावणी न करण्याचा निर्णय झाला आहे.

मंत्री नितीन राऊत यांनी आजच्या बैठकीत आरक्षण रद्द करण्याच्या निर्णया विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा न करता 7 मे रोजी जीआर काढण्यात आल्याचा आरोप नितीन राऊत यांनी केला.

Deputy Chief Minister Ajit Pawar lashed out at Nitin Raut over reservation in promotion

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात