दरभंगाच्या जिल्हधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून वाचविले ५०० रुग्णांचे प्राण, ऑक्सिजन प्लॅँटमध्ये बिघाड झाल्याने विस्कळित झाला होता पुरवठा

दरभंगा येथील मेडीकल ऑक्सिजन प्लॅँट बंद पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत दरभंगा येथील तरुण जिल्हाधिकारी डॉ. एस. एम. थियागराजन यांनी रात्रभर प्रयत्न करून ५०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचविले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे केवळ दरभंगाच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही प्राणदान मिळाले. Darbhanga District Collector rescues 500 patients overnight, supply disrupted due to breakdown in oxygen plant


विशेष प्रतिनिधी

पाटणा : दरभंगा येथील मेडीकल ऑक्सिजन प्लॅँट बंद पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत दरभंगा येथील तरुण जिल्हाधिकारी डॉ. एस. एम. थियागराजन यांनी रात्रभर प्रयत्न करून ५०० हून अधिक रुग्णांचे प्राण वाचविले. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे केवळ दरभंगाच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही प्राणदान मिळाले.

तांत्रिक कारणामुळे ऑक्सिजन प्लॅँट बंद पडल्याने दरभंगा जिल्ह्यातील रुग्णालयात ऑक्सिजनचा तीव्र तुटवडा निर्माण झाला. केवळ काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता.मधुबनी जिल्ह्यातील रुग्णालयांनाही त्याचा फटका बसणार होता. ऑक्सिजन प्लँटला आॅक्सिजनचा पुरवठा करणारा पाईप फुटला होता.डॉ. एस. एम. थियागराजन म्हणाले ५ मे रोजी सायंकाळी पाच वाजता ऑक्सिजन प्लॅँट बंद पडल्याचे समजले आणि धक्काच बसला. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न केले.

थियारगराजन यांनी तातडीने राज्याच्या मुख्यालयाला धोक्याचा इशारा दिला. इतर जिल्ह्यातील रुग्णालयांनाही आणिबाणीच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी तातडीने मुझ्झफरपूर, समस्तीपूर, पुर्णिया, किशनगंज आणि बेगुसराय जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून ऑक्सिजन सिलेंडर मागविले. तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. एका वाहनाने २७ सिलेंडर भरून ऑक्सिजन मधुबनी येथून आणण्यात आला.

देवघर येथील अभियंत्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्याच्याकडून माहिती घेऊन तातडीने दुरुस्तीचे काम सुरू झाले.

बेगुरसराय येथून वेल्डींग मशीन मागविले. बेगुसरायच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या मशीनबरोबरच रात्री साडेबारा वाजता ५० सिलेंडर पाठविले. ११५ किलोमीटर अंतर दोन तासात पार करून ते अडीच वाजता दरभंगा येथील पोहोचले. समस्तीपूर आणि मुझ्झफरपूर येथून प्रत्येकी ६० सिलेंडर आले. या सगल्या सिलेंडरच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली. याच वेळी दुरुस्तीचे कामही सुरू होते.

Darbhanga District Collector rescues 500 patients overnight, supply disrupted due to breakdown in oxygen plant

महत्वाच्या बातम्या