Mission Oxygen ! अजिंक्य राहणेची कोरोना संकटात महाराष्ट्रासाठी मदत जाहीर

  • देश सध्या कोरोना महामारीच्या भीषण संकटाला सामोरा जात असताना अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.

  • यंदाच्या आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणेला आतापर्यंत केवळ दोन सामने खेळता आले आहेत.तो मैदानात नसला तरी सामाजिक कार्यात सहभाग घेऊन त्यानं सामाजिक जाण राखत सर्वांची मनं जिंकली आहेत. 

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या खडतर काळात समाजाच्या विविध स्तरातील लोकं सरकारी आणि आरोग्य यंत्रणांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.आता अजिंक्य राहणेनं कोरोना संकटात खास महाराष्ट्रासाठी मदत जाहीर केली आहे.Delhi Capitals batsman Ajinkya Rahane donates 30 Oxygen Concentrators to aid fight against Covid-19

महाराष्ट्रा दिनाचं औचित्य साधत अजिंक्यने मिशन वायू या उपक्रमासाठी ३० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स दान केले आहेत.

ने अजिंक्यने केलेल्या मदतीसाठी त्याचे आभार मानले असून अजिंक्यची ही मदत राज्याच्या ग्रामीण भागात मिशन वायू अंतर्गत पोहचवली जाणार आहे.

विशेष म्हणजे हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स खास महाराष्ट्रासाठी वापरण्यात येणार असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा जिल्ह्यांना पुरविण्यात येणार आहेत.

‘महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर’च्यावतीनं (एमसीसीआयए) ट्विटकरुन अजिंक्य राहणेनं केलेल्या मदतीबाबत आभार व्यक्त करण्यात आले आहेत. “मिशन वायू अंतर्गत अजिंक्य रहाणेनं केलेल्या ३० ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सच्या मदतीसाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. हे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांना पुरविण्यात येतील”, असं ट्विट एमसीसीआयएनं केलं आहे.

अजिंक्य रहाणेव्यतिरीक्त आतापर्यंत पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन या खेळाडूंनी भारतातील आरोग्य यंत्रणेला कोरोनाविरुद्ध लढाईत मदत म्हणून आर्थिक हातभार लावला आहे.

भारताच्या कसोटी संघाचा उप-कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा हिस्सा आहे. परंतू सुरुवातीच्या काही सामन्यांचा अपवाद वगळता अजिंक्यला यंदा दिल्लीच्या संघात आपलं स्थान मिळवता आलेलं नाहीये. यंदा श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत दिल्लीचं नेतृत्व करत असून सध्या दिल्लीचा संघ गुणतालिकेत ७ सामन्यांत ५ विजयांसह १० गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे.

Delhi Capitals batsman Ajinkya Rahane donates 30 Oxygen Concentrators to aid fight against Covid-19