अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्येत होतेय मोठी वाढ, भारतासाठी धोक्याची घंटा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता कालावधी आणि तीव्रता वाढली आहे; मात्र बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत किंचित घट झाली आहे. २००१ ते २०१९ या कालावधीत अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या वारंवारितेत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच अतितीव्र वादळांचे प्रमाण १५० टक्क्यांनी वाढले आहे. Cyclone increases in Arab sea

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष नोंदवले आहेत. अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात मोसमी पावसाच्या पूर्वी समुद्रपृष्ठाचे तापमान वाढलेले दिसत असले, तरीही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची उष्णता केवळ अरबी समुद्राच्या भारतीय किनाऱ्यालगत आणि बंगालच्या उपसागराच्या पूर्व आणि मध्य भागांत वाढत आहे, ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे.



पूर्वी अरबी समुद्रापेक्षाही बंगालच्या उपसागरावर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी समुद्र आणि वातावरणीय स्थिती अनुकूल असे, परंतु अलीकडे अरबी समुद्रावर चक्रीवादळासंबंधी विसंगत स्थिती निर्माण होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निर्दशनास आले आहे. २०१५ मध्ये चपळ आणि मेघ ही अतितीव्र चक्रीवादळे एकाच महिन्यात लागोपाठ आली होती. २०१८ मध्ये आलेल्या सात चक्रीवादळांपैकी तीन चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती. २०१९ मध्ये निर्माण झालेल्या सर्वाधिक आठ चक्रीवादळांपैकी पाच चक्रीवादळे अरबी समुद्रात निर्माण झाली होती.

२०२० मध्ये आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे इतिहासात प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात मुंबईजवळ जमीन खचल्याची घटना घडली. २०२१ मध्ये आलेले ‘तौत्के’ चक्रीवादळ आतापर्यंतचे सर्वाधिक तीव्र वादळ असून याचा परिणाम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्व चार राज्यांत दिसून आला.
प्रस्तुत अभ्यासानुसार १९८२ ते २००० या काळात ९२ उष्णकटिबंधीय चक्रीवादळे निर्माण झाली. त्यापैकी ३० टक्के अतितीव्र होती. २००१ ते २०१९ या काळात चक्रीवादळांची संख्या १०० पर्यंत पोहोचली. त्यापैकी ३६ टक्के चक्रीवादळे अतितीव्र आहेत.

Cyclone increases in Arab sea

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात