प्रियंका गांधी- वड्राच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, कॉँग्रेस स्वबळावरच सर्व जागा लढविणार


विशेष प्रतिनिधी

रायपूर : उत्तर प्रदेशात कॉँग्रेसने स्वबळावरच लढण्याचा निर्णय घेतला आहे. कॉँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणिस प्रियंका-गांधी वड्रा याच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे.Priyanka Gandhi- Vadra is the face of Chief Minister in Uttar Pradesh, Congress will fight for all the seats on its own

पांडे यांनी सांगितले की उत्तर प्रदेशातील जनता मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्य निवडणुका लढविल्या जातील. कॉँग्रेस सर्व जागांवर निवडणूक लढविणार आहे.



कॉँग्रेस उत्तर प्रदेशात सर्व ४०३ जागांवर निवडणूक लढविण्यास तयार आहे असे सांगून तिवारी यांनी सांगितले की समाजवादी पार्टी किंवा इतर कोणत्याही अन्य पक्षाशी युतीची कोणतीही चर्चा सुरू नाही. कॉग्रेस कार्यकर्त्यांना बुथ स्तरावर काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. छत्तीसगडमध्ये पंधरा वर्षे सत्तेच्या बाहेर राहूनही बूथ स्तरावर काम केल्याने यश मिळाले. त्यामुळे उत्तर प्रदेशातही हाच प्रयोग केला जाणर आहे.

उत्तर प्रदेशातील १०० हून अधिक कॉँग्रेसचे पदाधिकारी छत्तीसगडमध्ये सध्य प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना बूथ स्तरावरील व्यवस्थापनापासून ते कॉँग्रेसच्या इतिहासापर्यंत विविध प्रकारची माहिती दिली जात आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही प्रशिक्षण देण्यासाठीआले होते.

रायपूर येथील निरंजन धर्मशाळा येथे मास्टर ट्रेनरला बूथ व्यवस्थापनाची माहिती देण्यात आली. या पाच दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात प्रियंका गांधी यांनीही व्हर्च्युलही सहभाग नोंदविला होता. हे मास्टर ट्रेनर जिल्हा, विधानसभा आणि ब्लॉक स्तरावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणार आहेत.

Priyanka Gandhi- Vadra is the face of Chief Minister in Uttar Pradesh, Congress will fight for all the seats on its own

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात