धक्कादायक : काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मुलाचे इस्लामिक स्टेटशी संबंध! NIA ने केली छापेमारी

Former Karnataka Congress MLAs son link with Islamic State NIA raids in Mangluru

Islamic State : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कर्नाटकचे दिवंगत काँग्रेस नेते बीएम इदिनब्बा यांच्या घरावर छापा टाकला आहे. त्यांचा मुलगा बीएम बाशाचे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने हा छापा टाकला आहे. बीएम बाशा हे कर्नाटकातील रिअल इस्टेटचे मोठे व्यापारी आहेत. Former Karnataka Congress MLAs son link with Islamic State NIA raids in Mangluru


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) कर्नाटकचे दिवंगत काँग्रेस नेते बीएम इदिनब्बा यांच्या घरावर छापा टाकला आहे. त्यांचा मुलगा बीएम बाशाचे दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून एनआयएने हा छापा टाकला आहे. बीएम बाशा हे कर्नाटकातील रिअल इस्टेटचे मोठे व्यापारी आहेत. एनआयएने बुधवारी सकाळी मंगळुरूच्या मस्तिकट्टे भागातील बाशाच्या घरावर छापा टाकला. तपास यंत्रणा सध्या बाशा आणि त्याच्या पत्नीची चौकशी करत आहे. असे सांगितले जात आहे की, एनआयएने यादरम्यान काही कागदपत्रेदेखील जप्त केली आहेत.

एनआयएच्या 20 सदस्यीय पथकाने बाशाच्या घरावर छापा टाकला होता. यासह एनआयने जम्मू-काश्मीरमधील तीन ठिकाणीही छापेमारी केली आहे. प्राप्त माहितीनुसार, यात बांदीपोरा येथे असलेल्या हार्डवेअर स्टोअरचाही समावेश आहे. एजन्सीचे म्हणणे आहे की, या प्रकरणात अजूनही छापे सुरू आहेत. काँग्रेसच्या माजी नेत्याच्या मुलावर इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याचा आरोप असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Former Karnataka Congress MLAs son link with Islamic State NIA raids in Mangluru

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात