वैद्यकीय क्षेत्रात केंद्राची दमदार कामगिरी : सात वर्षांत एमबीबीएसच्या ५६ टक्के जागांमध्ये वाढ, मेडिकल कॉलेजची संख्याही ५५८ वर

Modi Govt strong performance in medical field : 56 per cent increase in MBBS seats in seven years, number of medical colleges also increased to 558

Modi Govt strong performance in medical field : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2014 पासून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. मागच्या 7 वर्षांत देशात MBBSच्या 56 टक्के जागा वाढल्या आहेत. 2014 मध्ये MBBSसाठी 54,348 जागा होत्या, त्या 2020 मध्ये वाढून 84,649 झाल्या आहेत. त्याचबरोबर या कालावधीत पीजी जागांमध्येही 80 टक्के वाढ झाली आहे. पीजीमधील जागांची संख्या 2014 मध्ये 30,191 होती, जी 2020 मध्ये वाढून 54,275 झाली आहे. याव्यतिरिक्त याच काळात देशात 179 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामुळे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 558 वर गेली आहे. त्यापैकी 289 शासकीय आणि 269 खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. Modi Govt strong performance in medical field : 56 per cent increase in MBBS seats in seven years, number of medical colleges also increased to 558


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2014 पासून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. मागच्या 7 वर्षांत देशात MBBSच्या 56 टक्के जागा वाढल्या आहेत. 2014 मध्ये MBBSसाठी 54,348 जागा होत्या, त्या 2020 मध्ये वाढून 84,649 झाल्या आहेत. त्याचबरोबर या कालावधीत पीजी जागांमध्येही 80 टक्के वाढ झाली आहे. पीजीमधील जागांची संख्या 2014 मध्ये 30,191 होती, जी 2020 मध्ये वाढून 54,275 झाली आहे. याव्यतिरिक्त याच काळात देशात 179 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, ज्यामुळे देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढून 558 वर गेली आहे. त्यापैकी 289 शासकीय आणि 269 खासगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत.

Modi Govt strong performance in medical field : 56 per cent increase in MBBS seats in seven years, number of medical colleges also increased to 558

मेडिकलमध्ये ओबीसी, आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीही तरतूद

झटपट निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रातील मोदी सरकारने 29 जुलै 2021 वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे.

केंद्र सरकारने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय कोटा योजनेअंतर्गत चालू शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून लागू होईल. या अंतर्गत 5,550 उमेदवारांना MBBS, MS, BDS, MDS, Dental, Medical आणि Diploma मध्ये लाभ मिळतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे 1,500 OBC आणि 550 EWS विद्यार्थ्यांना MBBS मध्ये प्रवेश मिळेल. त्याच वेळी, 2,500 ओबीसी विद्यार्थी आणि सुमारे 1,000 ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळेल.

या प्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2021 रोजी याच विषयावर बैठक घेतली होती. केंद्र सरकारने हा ऐतिहासिक निर्णय बैठकीनंतर केवळ तीन दिवसांनी घेतला.

Modi Govt strong performance in medical field : 56 per cent increase in MBBS seats in seven years, number of medical colleges also increased to 558

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण