Tokyo Olympics : सेमीफायनलमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचा अर्जेंटिनाकडून पराभव, ब्राँझ मेडलच्या आशा कायम

indian women hockey team lost semifinal game against argentina in tokyo olympics 2020 they will play match for bronze medal

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला आहे. यासह भारतीय संघाचे ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंगले आहे. सामन्याच्या पूर्वार्धात भारताचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गुरजित कौरने संघासाठी गोल केला. मात्र, टीम इंडियाला आपली आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. अर्जेंटिनाने 18 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाने सामन्याच्या 36 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली आणि संघाला ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात यश आले. पराभव झाला असला तरी भारतीय संघ कांस्यपदक जिंकण्यासाठी सामना खेळणार आहे. indian women hockey team lost semifinal game against argentina in tokyo olympics 2020 they will play match for bronze medal


वृत्तसंस्था

टोकियो : भारतीय महिला हॉकी संघ उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाला आहे. यासह भारतीय संघाचे ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंगले आहे. सामन्याच्या पूर्वार्धात भारताचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला गुरजित कौरने संघासाठी गोल केला. मात्र, टीम इंडियाला आपली आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. अर्जेंटिनाने 18 व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली. यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाने सामन्याच्या 36 व्या मिनिटाला दुसरा गोल करत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली आणि संघाला ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखण्यात यश आले. पराभव झाला असला तरी भारतीय संघ कांस्यपदक जिंकण्यासाठी सामना खेळणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकला चांगली सुरुवात झाली नाही आणि संघाने पहिले तीन सामने गमावले, पण नंतर राणी रामपालच्या नेतृत्वाखाली संघाने जोरदार पुनरागमन केले, सलग तीन विजय नोंदवत त्यांनी उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. भारतीय संघाची मागील सर्वोत्तम कामगिरी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये होती, जेव्हा भारतीय टीम सहा संघांपैकी चौथ्या स्थानावर होती. महिला हॉकी संघाने त्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण केले आणि सामने राउंड-रॉबिन तत्त्वावर खेळले गेले.

indian women hockey team lost semifinal game against argentina in tokyo olympics 2020 they will play match for bronze medal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात