कोरोना बॅचला फटका बसण्यास सुरूवात, एचडीएफसी बँकेने चक्क जाहिरातीत म्हटले की कोरोना काळातील उत्तीर्णांनी अर्ज करू नयेत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे शक्य नसल्याने ऑनलाईन परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्यांना फटका बसण्यास सुरूवात झाली आहे. एचडीएफसी बॅँकेने दिलेल्या जाहिरातीत चक्क म्हटले आहे की कोरोना काळात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या काळात अर्ज करू नयेत.As the Corona batch begins to take a hit, HDFC Bank said in ad that Corona period passers should not apply

गेल्या दीड वर्षांपासून देशात कोरोना महामारी सुरू झाली आहे. त्यामुळे २०२० आणि २०२१ मध्ये प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकल्या नाहीत. ऑनलाईन परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आल्या. परीक्षा घ्याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांना भविष्यात त्याचा फटका बसेल असे अनेक तज्ज्ञ म्हणत होते. परंतु, महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यांनी याला विरोध केला. यासाठी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला होता. मात्र, न्यायालयानेही परीक्षा घेण्यास मान्यता दिली नाही.



अद्यापही शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत. विद्यार्थ्यांचे निकालही गुणवत्तेचे निकष लावून जाहीर झाले आहेत. त्यामुळे, 2021 मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

एचडीएफसी बँकेच्या तमिळनाडूतील मदुराई शाखेने जाहिरात दिली होती. ज्यामध्ये 2021 मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी अट ठेवण्यात आली होती. पण अवघ्या काही मिनिटांत ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली. वर्तमानपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध होताच, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अनेकांनी एचडीएफसी बँकेनं घातलेल्या अटीवर टीका केली. त्यामुळे, वाढती टीका लक्षात घेऊन बँकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नवीन जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. बँकेने आपली चूक मान्य केली आहे. तसेच जाहिरात टाईप करत असताना, त्यामध्ये चूक झाल्याचं म्हटलं आहे.

बँकेनं आता एक वेगळी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 2021 साली पास झालेले विद्यार्थी अर्ज करू शकतात, असेही त्यामध्ये लिहिण्यात आलं आहे. झालेल्या चुकीबद्दल बँकेकडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या जाहिरातीमुळे पुन्हा एकदा 2021 पासआऊट विद्यार्थ्यांच्या भविष्यातील संधीबाबत तर्कवितर्क आहेत.

As the Corona batch begins to take a hit, HDFC Bank said in ad that Corona period passers should not apply

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात