ऑलिम्पिक पदकविजेत्या लोव्हलिनाला आसाम सरकार देणार अनोखी भेट, घराकडे जाण्यासाठी मिळणार पक्का रस्ता


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घालणाऱ्या भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोगोर्हेनला आसाम सरकार अनोखी भेट देणार आहे. लोव्हलिनाच्या गावातील कच्चा रस्त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. लोव्हलिना ऑलिम्पिकमधून पदक घेऊन परत गावी येईल तेव्हा ती पक्या रस्त्याने घरी जाणार आहे.Assam govt to give Olympic medalist Lovelina a unique gift, paved road to her home

लोव्हलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. ऑलिम्पिकमधील लोव्हलिनाच्या पदकाची खात्री होताच, तिच्या गावातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. स्थानिक आमदार विश्वजित फुकन यांनी त्यासाठी पुढाकार घषतला आहे.



चायनीज तायपेईच्या माजी विश्वविजेत्या नियन-चिन चेनला हरवून 30 जुलै रोजी उपांत्य फेरीत प्रवेश करताना लोव्हलिना बोगोर्हेनने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पहिले बॉक्सिंग पदक मिळवले.

लोव्हलिानीचे वडील टिकेन यांनी म्हणाले, तिने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. सरकारने रस्ता तयार केला आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. कारण सरकारकडून लोव्हलिना आणि आमचे गाव दोघांनाही पुरस्कार दिल्यासारखे आहे. सरकारने आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. गेल्या 2-3 वर्षांपासून सरकारकडून मदत मिळत आहे. त्यामुळे मला सरकारचे आभार मानायचे आहेत.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोव्हलिनाला सरावाला मदत करण्यासाठी एकूण 5 लाख रुपये दिले. पदक मिळाल्याची बातमी पुढे आली, तेव्हा स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि रस्त्याचे काम सुरू झाले.

गुवाहाटीमध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मंत्री आणि आमदारांसोबत टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत लोव्हलिनाच्या यशासाठी प्रार्थना केली. आसाम सरकार राज्यातील प्रतिभाशाली तरुणांना पुढे येण्यासाठी मदत करत आहे.

Assam govt to give Olympic medalist Lovelina a unique gift, paved road to her home

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात