मुंबईत महापालिकेच्या शाळांतून काळा फळा होणार दूर, वर्ग बनणार डिजिटल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून भविष्यात भिंतींवरील काळा फळा इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात १३०० वर्ग डिजिटल करण्यात येत आहेत. यामध्ये इंटॲक्टिव्ह पॅनल, तसेच मल्टिमीडिया अशा सुविधा असतील, त्यासाठी महानगरपालिका ३६ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च करणार आहे. BMCC school becomes digital

अर्थसंकल्पात डिजिटल वर्ग तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद केली होती. त्यानुसार आता हे डिजिटल वर्ग प्रत्यक्षात उतरणार आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे डिजिटल वर्ग तयार करण्यात येत आहेत. अभ्यासक्रमही दृकश्राव्य पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खेळ, प्रश्नमंजूषा या माध्यमातून विषयाचे अवांतर ज्ञान देता येणार आहे.हिमालयाचा भूगोल शिकवताना प्रत्यक्ष हिमालयच फळ्यावर दिसणार आहे, असे हे डिजिटल वर्ग असतील. शिक्षकांना प्रामुख्याने खडूच्या धुळीचा त्रास होऊन त्याची ॲलर्जी होते; मात्र आता या डिजिटल फळ्यांमुळे हा त्रासही होणार नाही. फळ्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे. ६५ इंचाची स्क्रिन, ५० गिगाबाईट मेमरी, चार गिगाबाईट रॅमचे फळे असतील.

BMCC school becomes digital

महत्त्वाच्या बातम्या