पेट्रोल पंपावर बिल देताना महागाईचा विकास दिसेल, राहुल गांधींची बोचरी टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बऱ्याच राज्यांमध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरू होत आहे. पेट्रोल पंपावर बिल देताना आपल्याला मोदी सरकारने केलेला महागाईचा विकास दिसेल. टॅक्स वसुली रूपातून येणाऱ्या लाटा सातत्याने येत जात राहिल्या आहेत, असे खोचक ट्विट कॉंग्रसचे नेते राहुल गांधींनी करीत सरकारवर निशाणा साधला आहे. Rahul Gandi targets Modi Govt.

पेट्रोल, डिझेलच्या किमतीने सर्व उच्चांक मोडले असून देशातील १३५ जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. या निमित्ताने राहुल गांधींनी टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढते दर पाहता यापुढेही इंधनाचे दर चढे राहण्याची शक्यता वर्तविली जात असून आज पेट्रोलच्या दरात २६ ते ३१ पैशांनी तर डिझेलच्या दरात २६ ते २८ पैशांनी प्रतिलिटर वाढ झाली आहे.पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात इंधनाचे दर स्थिर होते. त्यानंतर मे महिन्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल १६ वेळा वाढ झाली. तर जूनच्या आठवड्यातच चार वेळा दरवाढ झाली आहे. दिल्लीत मे महिन्यात पेट्रोल ४.०९ रुपयांनी तर डिझेल ४.६८ रुपयांनी महागले. तर ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर १०१ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

Rahul Gandi targets Modi Govt.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती