लसीकरणाबाबतचा अपप्रचार रोखण्याचे ‘आयएमए’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आधुनिक औषधी आणि कोरोना लसीकरणाबाबत होत असलेल्या चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे गरजेचे असून काही मंडळी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी अशाप्रकारचा अपप्रचार करत असल्याचा गंभीर आरोपही आयएमएकडून करण्यात आला आहे. याबाबत तसेच देशभरातील डॉक्टरांवरील वाढलेल्या हल्ल्यांप्रकरणी आयएमएने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. IMA wrote letter to PM Modi



कोरोनाशी दोन हात करताना प्राण गमावणाऱ्या डॉक्टरांना कोविड हुतात्म्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आयएमएकडून करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या आणि अपप्रचार करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करायला हवी, असेही आयएमएने म्हटले आहे. ‘साथरोग कायदा-१८९७’ आणि भारतीय दंड विधानसंहिता आणि ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५’ आदींच्या माध्यमातून ही कारवाई केली जावी, अशी मागणी देखील ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे.

देशभरातील अठरापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे केंद्रानेच लसीकरण करावे याबाबतची जबाबदारी राज्ये अथवा खासगी रुग्णालये यांच्याकडे सोपविता कामा नये, असेही आयएमच्या पत्रामध्ये म्हटले आहे.

IMA wrote letter to PM Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात