AURANGABAD RAPE CASE : संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी! औरंगाबाद बलात्कार घटनेवरुन चित्रा वाघ संजय राऊतांवर संतापल्या


  • निजामाच्या राजवटीत राहत आहोत का असा प्रश्न पडलाय

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या भयावह घटना समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये दरोडेखोरांनी गावातील दोन महिलांवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.सर्वच स्तरावर याविषयी संताप व्यक्त होत आहे. AURANGABAD RAPE CASE: Sanjay Raut’s writing for the protection of the corrupt instead of the protection of women! Chitra Wagh gets angry with Sanjay Raut over Aurangabad rape incident

औरंगाबादच्या घटनेवरुन भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ देखील सरकारवर संतापल्या आहेत.शिवसेना खासदार संजय राऊतांवरही त्यांनी टीकेचे आसडू ओढले आहेत.

संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचीत उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसल्यामुळे संजय राऊतांपर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहचली नसेल असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे

औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील वस्तू आणि पैसेही या दरोडेखोरांनी चोरले आहेत.

यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी बलात्कार केला. ज्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाला त्यातल्या एका महिलेला आठ महिन्यांचं बाळ आहे.

AURANGABAD RAPE CASE : Sanjay Raut’s writing for the protection of the corrupt instead of the protection of women! Chitra Wagh gets angry with Sanjay Raut over Aurangabad rape incident

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात