१०० कोटींचे प्रकरण : शिंदे, पलांडे या दोन्ही स्वीय सहायकांना अटक, देशमुखांवर अटकेची टांगती तलवार

Anil Deshmukh PA Shinde and Palande Arrested By ED, Now ED Summons Deshmukh in 100 Crore Recovery Case

Anil Deshmukh :  मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. ईडी शुक्रवारी दिवसभर देशमुखांच्या संबंधित पाच ठिकाणांवर छापेमारी केली. यानंतर त्यांच्या दोन स्वीय सहायकांनाही अटक केली. ईडीने अनिल देशमुखांना समन्स बजावले आहे. त्यांना यामुळे ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. Anil Deshmukh PA Shinde and Palande Arrested By ED, Now ED Summons Deshmukh in 100 Crore Recovery Case


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. ईडी शुक्रवारी दिवसभर देशमुखांच्या संबंधित पाच ठिकाणांवर छापेमारी केली. यानंतर त्यांच्या दोन स्वीय सहायकांनाही अटक केली. ईडीने अनिल देशमुखांना समन्स बजावले आहे. त्यांना यामुळे ईडीच्या कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. दरम्यान, अनिल देशमुखांनी सध्या ईडी समक्ष उपस्थित राहण्यास नकार दिल्याचे कळते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना लिहिलेल्या पत्रामुळे हा सर्व प्रकार जगजाहीर झाला. आपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी आरोप केला की, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबईतल्या बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. यानंतर कोर्टाच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी सुरू झाली.

यापूर्वी एप्रिलमध्ये सीबीआयने अनिल देशमुखंची चौकशी केली. आता ईडीची चौकशी सुरू आहे. देशमुख यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना ताब्यात घेतले. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक झाली आहे. स्वीय सहायकांच्या अटकेमुळे आता अनिल देशमुखांनाही अटक होते की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Anil Deshmukh PA Shinde and Palande Arrested By ED, Now ED Summons Deshmukh in 100 Crore Recovery Case

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात