प्रतिनिधी
मुंबई : 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटक केली होती. अखेर 11 महिन्यानंतर देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दसरा देशमुख घरी साजरा करतील, अशी शक्यता आहे. पण देशमुखांच्या विरोधात सीबीआयने देखील गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेबाबत अद्याप साशंकता आहे. Anil Deshmukh granted bail after 11 months
अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुख हे महिन्याला 100 कोटींची वसुली करण्यास सांगत होते, असा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना ईडीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना 1 लाखाच्या जाचमुचलक्यावर जामीन मंजूर केला. ईडी या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात ईडी अनिल देशमुख यांच्या विरोधात काय युक्तिवाद करणार आणि त्यावर न्यायालय काय निर्णय देणार??, यावर अनिल देशमुख यांचा दसरा त्यांच्या घरी साजरा होणार की कोठडीतच हे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App