परमबीर सिंग यांनी पुरावे दिले नाहीत तरी दिलासा नाहीच, देशमुख यांच्या निकटवतीर्यांच्या २६ कंपन्यांचा ईडीकडून तपास,


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांचे प्रतिज्ञापत्र समोर आले आहे. यामध्ये सिंग यांनी देशमुख यांच्याविरोधात आपल्याकडे पुरावे नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी पुरावे देण्याचा आणि ईडीच्या तपासाचा संबंध नाही. देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या २६ कंपन्यांचा तपास ईडीकडून सुरू आहे.Although Parambir Singh did not provide evidence, there is no consolation.

शंभर कोटींच्या वसुलीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले देशमुख यांच्या निकटवतीर्यांच्या विविध २७ कंपन्या आहेत. शंभर कोटी रुपये वसुलीतील रक्कम हवालामार्फत या कंपन्यांत वळविल्याचा संशय ईडीला आहे. त्यापैकी बहुतांश शेल कंपन्या असून, काळा पैसा व्यवहारात आणण्यासाठी त्यांचा वापर केल्याचे गृहीत धरून तपास सुरू आहे.



चांदीवाल आयोगाच्या चौकशीसोबतच अनिल देशमुख यांची ईडी आणि सीबीआय या केंद्रीय संस्थांमार्फत स्वतंत्रपणे चौकशी सुरू झालेली आहे. त्यातील एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्या अटकेचा आणि चांदीवाल आयोगाच्या चौकशीचा एकमेकांशी संबंध नसल्याचे सांगितले जात आहे.

देशमुख यांचा या कंपन्यांशी थेट संबंध नसला, तरी त्यांच्यामुळे या कंपन्यांत आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे या आर्थिक व्यवहारांची माहिती त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे १३ आणि नातेवाईक, तसेच जवळच्या मित्रांच्या नावे १४ कंपन्या आहेत. मात्र, अनेक कंपन्यांमध्ये काहीही व्यवसाय नाही. मात्र, त्यांचे अस्तित्व दाखवून काळा पैसा व्यवहारात आणल्याचा संशय आहे.

Although Parambir Singh did not provide evidence, there is no consolation.

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात