राजीनाम्यानंतर सचिन सावंत मुख्यंत्र्यांच्या भेटीला, चर्चांना आले उधाण,मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड


आता मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सावंत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला.After his resignation, Sachin Sawant called on the Chief Minister , Atul Londhe appointed as Chief Spokesperson


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्य प्रवक्तेपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला गोंधळ समोर आला आहे . काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. मात्र, आता सावंत मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान वर्षावर पोहोचले आहेत.उद्धव ठाकरे यांच्या भेट घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणावरुन वाद होत असल्याचे समोर आले आहे. आता मुख्य प्रवक्तेपदी अतुल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सावंत यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. सचिन सावंत यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.मुख्यमंत्र्यांसोबत सावंत यांनी जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली केली. मात्र, सावंत आणि मुख्यमंत्र्यांमधल्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पक्षांतर्गत गोष्टींमध्ये त्यांना डावलून अतुल लोंढे यांना पदं मिळत असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे. त्यामुळे सावंतांनी राजीनामा दिला. त्यांनी लगेच ट्विटरवरून पदभार सोडल्याची माहिती दिली. एवढंच नाहीतर सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटमधून प्रवक्तेपदाचा उल्लेख सुद्धा काढून टाकला आहे. त्यातच सचिन सावंत उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेल्याने आता राजकारणात आणखी ट्विस्ट पाहायला मिळू शकतो.

विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांपासून सावंत हे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम पाहत होते. वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन सावंत यांनी काँग्रेस पक्षाची सडेतोड भूमिका मांडली होती.

After his resignation, Sachin Sawant called on the Chief Minister , Atul Londhe appointed as Chief Spokesperson

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात