अरुणाचल प्रदेशापाशी चीनी लष्कराच्या वाढत्या हालचाली, भारताचीही पुरेपूर सज्जता


विशेष प्रतिनिधी

अरुणाचल प्रदेश – अरुणाचल प्रदेश विभागासमोरील आपल्या अंतर्गत हद्दीत लष्करी सरावाची तीव्रता आणि सैन्याच्या तैनातीचे प्रमाण चीनने वाढविले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कोणत्याही आव्हानाला प्रत्यूत्तर देण्यासाठी भारताने आकस्मिक योजनेची सज्जता ठेवली आहे.China PLA moving on Arunachal border

लष्कराच्या पूर्व विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चिनी लष्कराकडून वार्षिक लष्करी सराव केला जातो. यावेळी अंतर्गत भागांतील हालचालींचे प्रमाण वाढले आहे. चीनने कार्यान्वित केलेल्या सैन्याच्या काही राखीव रचना सरावाच्या क्षेत्रात कायम ठेवण्यात आल्या आहेत.



तेथेच या हालचाली होत आहेत. दोन्ही देश नियंत्रण रेषेनजिक काही पायाभूत सुविधांची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे प्रसंगी समस्या निर्माण होतात. नव्या सुविधांबाबतच्या घडामोडी घडायला लागल्यापासून सैन्याच्या तैनातीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

भारताने यानंतर अनेक पावले उचलली असल्याचे नमूद करून लेफ्टनंट जनरल पांडे यांनी सांगितले की, नियंत्रण रेषा तसेच अंतर्गत क्षेत्रांजवळील परिसरातील टेहळणीचे प्रमाण वाढविण्यात आले आहे.

China PLA moving on Arunachal border

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात