‘आमच्यासोबत रामदास कदम सुद्धा शिवसेना सोडणार होते’ , निलेश राणेंचा मोठा खुलासा


 

राणे म्हणाले की, ‘आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम देखील शिवसेना सोडणार होते. शिवसेना सोडणाऱ्या 15 नेत्यांची यादी होती. या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते”Ramdas Kadam was also going to leave Shiv Sena with us’, a big revelation of Nilesh Rane


विशेष प्रतिनिधी

महाड : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम अडचणीत सापडले आहे. दरम्यान भाजपचे नेते निलेश राणे पत्रकारांशी बोलत असताना निलेश राणे यांनी रामदास कदम यांच्याबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे.

राणे म्हणाले की, ‘आम्ही शिवसेना सोडली तेव्हा रामदास कदम देखील शिवसेना सोडणार होते. शिवसेना सोडणाऱ्या 15 नेत्यांची यादी होती. या यादीत रामदास कदम यांचे पहिले नाव होते’


शिवसेना खा. भावना गवळी आजही ईडीपुढे हजर होणार नाहीत, चिकुनगुनियाचे कारण देत 15 दिवसांची मागितली मुदत


आमच्या तेव्हाच्या शासकीय बंगल्यावरून रामदास कदम बाहेर पडले, खेडमध्ये परिस्थिती बघून येतो, कार्यकर्त्यांशी बोलून येतो मग बॉम्ब टाकूया असा शब्द दिला. ते महाडजवळ आले तेव्हा त्यांना बंगल्यावरून फोन आला विरोधी पक्ष नेते पद देतो, त्यावेळी त्यांनी गाडी वळवली आणि ‘मातोश्री’ला गेले आणि पद घेतलं.असा खुलासा देखील नितेश राणे यांनी केला आहे.

पुढे राणे म्हणाले की , हेच रामदास कदम जे नेहमी पक्षाच्या विरोधात काम करत आलेत.अरे व्वा! ‘मेरे सपनो की रानी’ गाणं काय वाजवलंय; मुंबई पोलीस बँडचा जबरदस्त रामदास कदम यांच्याकडून पक्षनिष्ठा याबद्दल उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांनी अजिबात अपेक्षा ठेवू नये. ते तोंडावर सरळसरळ खोटे बोलत असतात.

‘महाराष्ट्र आता रामदास कदम विरोधी पक्षनेता होता हे विसरले आहे, बाहेर येऊन त्यांनी नारायण राणे यांच्यावर फक्त टीका केली, आता कदम हे ७० वयाचे झाले आहे. त्यांनी आता खरं बोललं पाहिजे, खोटे बोलणे सोडून द्यावे, असंही राणे म्हणाले.

‘Ramdas Kadam was also going to leave Shiv Sena with us’, a big revelation of Nilesh Rane

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात