मेट्रो ऑन फास्टट्रॅक : अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर महत्त्वाच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी आता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोचा कार्यभार होता. परंतु 2019 मध्ये जनमताचा कौल डावलून ठाकरे – पवार सरकार अस्तित्वात आल्यानंतर अश्विनी भिडे यांची मेट्रो मधून बदली केली होती. Additional responsibility for the post of Managing Director of Mumbai Metro Rail to Ashwini Bhide

व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना महत्वाच्या खात्यांची जबाबदारी न सोपवता त्यांना बाजुला करण्यात आले होते. पण आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अश्विनी भिडे यांची पुन्हा एकदा एमएमआरडीएत वर्णी लागली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.


Modi Pune Metro : पुणे मेट्रोचे उद्घाटन; प्रत्यक्ष मेट्रोत पंतप्रधान मोदींचा राजकीय पुढाऱ्यांशी नव्हे, तर विद्यार्थ्यांशी थेट संवाद!!


परंतु या मंगळवारी १२ जुलै २०२२ रोजी अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय घेत याबाबतचा आदेश जारी करण्यात आले आहे. त्यामुळे एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडून याचा अतिरिक्त कार्यभार त्वरीत स्वीकारण्यास कळवले. त्यामुळे अश्विनी भिडे यांच्याकडे आता महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदासह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार राहणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कोस्टल रोडसह मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आता मेट्रो वूमन गती देणार आहे.

अश्विनी भिडे यांच्यासह श्रीकर परदेशी आणि ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ भाऊसाहेब दांगडे यांचीही बदली करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी यांची वर्णी उपमुख्यमंत्री यांच्या सचिवपदी करण्यात आली आहे, तर दांगडे यांची नियुक्ती कल्याण-डोंबविली महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.

Additional responsibility for the post of Managing Director of Mumbai Metro Rail to Ashwini Bhide

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात