आरे मेट्रो कार शेड : आदित्य ठाकरे यांच्या शंका – कुशंकांबाबत मेट्रो मॅन ई. श्रीधरन यांची चोख उत्तरे!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुंबईतील आरे मेट्रो कार शेडला अजूनही शिवसेनेचा विरोध आहे. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने मेट्रो कार शेड संदर्भात आधीच्या ठाकरे पवार सरकारचा निर्णय बदलून आरे मध्येच मेट्रो कार शेड करण्याचा निर्णय पुन्हा घेतला आहे.Aarey Metro Car Shed: Aditya Thackeray’s Doubts – Metro Man E. Sreedharan’s correct answers

या पार्श्वभूमीवर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरे मधल्या आंदोलनात सहभाग नोंदवून बऱ्याच शंका कुशंका उपस्थित केल्या होत्या. मेट्रोला मेंटेनन्स साठी दोन-तीन महिन्यांनी कारशेड मध्ये जावे लागते. मग तिच्यासाठी एवढ्या मोठ्या कार शेडची गरजच काय?? आणि ती देखील आरे मध्येच का?? असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते.



या बद्दल दिल्लीतील ऑर्गनायझर प्रकाशनाने फॅक्ट चेक केले. मेट्रो मॅन इ श्रीधरण यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी श्रीधरन यांनी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकांना चोख उत्तरे दिली.

ई. श्रीधरन यांनी दिलेली उत्तरे अशी :

मुळात मेट्रोचे जाळे व्यापक आणि विस्तृत असेल तर मेट्रोच्या मेंटेनन्स साठी दररोज अथवा दर दोन-तीन दिवसांनी कार शेडमध्ये न्यावेच लागते. सुरक्षित प्रवास आणि सुरक्षित मेट्रो यासाठी हे आवश्यक असते. किंबहुना मेट्रो कार शेड हे मेट्रोच्या जाळ्याचे “ब्रेन सेंटर” असते. जेथून मेट्रोच्या आणि मेट्रो प्रवासाच्या सुरक्षिततेची हमी देता येऊ शकते.

मेट्रो मेंटेनन्सचे दोन ते तीन प्रकार आहेत. एक दररोजचा मेंटेनन्स, दुसरा दर दोन-तीन महिन्यांनी करावा लागणारा मेंटेनन्स, ज्याच्यामध्ये बऱ्याच यांत्रिक आणि तांत्रिक बाबी समाविष्ट असतात आणि त्यानंतर तिसरा सर्व साधारणपणे वार्षिक मेंटेनन्स हे सर्व मेंटेनन्स कार शेडमध्येच होतात. ते मेट्रो रूट वर होत नाहीत.

मुंबई मेट्रो कार शेड आरे मध्ये असावी ही सूचना मी देवेंद्र फडणवीस सरकारला केली होती. मेट्रोची कार शेड ही एक तर मध्यवर्ती स्थानकावर असावी किंवा थेट एका विशिष्ट टोकाला असावी जेणेकरून वाहतुकीत कोणताही अडथळा उत्पन्न होत नाही.

आरेची मेट्रो कार शेड ही एका टोकाला आहे. आणि ती साईट विचारपूर्वकच निवडली आहे. यामध्ये पर्यावरणाला धोका उत्पन्न होत नाही. याचा अभ्यास करूनच तिथे कार शेड उभी करण्याची सूचना केली होती.

पर्यावरणाबरोबरच नागरिकांनी अर्थव्यवस्थे अर्थव्यवस्थेचाही विचार केला पाहिजे. स्वस्तातली सार्वजनिक वाहतूक आणि तीही सुरक्षित याला प्राधान्य दिले पाहिजे. या दृष्टीने मुंबईत मेट्रो महत्त्वाची आहे आणि आरे मध्ये कार शेड होणे याच्यात कुठलीही गुंतागुंत नाही. इंजीनियरिंगच्या शास्त्रीय तत्वावर आधारित ही कार शेड उभी राहू शकते.

Aarey Metro Car Shed: Aditya Thackeray’s Doubts – Metro Man E. Sreedharan’s correct answers

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात