पुणे एसटीचा अपघात , एसटी चालविण्याचे केवळ एक दिवसाचे दिले होते प्रशिक्षण


ह्या गाडीचे चालक हे नुकतेच एसटीत कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते. Accident of Pune ST, only one day training was given to operate ST


विशेष प्रतिनिधी

पुणे : इंदापूर – पुणे एसटी गाडीचा गुरुवारी सकाळी दहा वाजता हडपसर जवळ अपघात झाला.सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून एसटीचे मात्र नुकसान झाले आहे.दरम्यान एसटी चालविण्याचे केवळ एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन खासगी चालकाच्या हाती एसटीचे स्टेरिंग देणे महागात पडले आहे.ह्या गाडीचे चालक हे नुकतेच एसटीत कंत्राटी पद्धतीने घेतलेले खासगी चालक होते.

पुणे एसटी विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी ज्ञानेश्वर रणवरे यांनी सांगितले की ,’अपघाताविषयी नेमकी माहिती नाही. मात्र अपघात हा किरकोळ स्वरुपाचा असणार आहे. मोठा असता तर तशा सूचना व माहिती मिळाली असती’



एसटीचा ताबा खासगी चालकाच्या हाती देण्यात आला होता. गाडी अकराच्या सुमारास हडपसर जवळ आली असता समोरचा अंदाज न आल्याने समोरच्या टॅन्कर गाडीला एसटीने पाठीमागून ठोकले आहे.यात टँकर व एसटी चे नुकसान झाले आहे.

Accident of Pune ST, only one day training was given to operate ST

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात