विशेष प्रतिनिधी
मुंबई – चोर समजून एका २६ वर्षीय तरुणाची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. चंद्रकांत जितेंद्र वसावा असे या मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी मालवणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक करण्यात आली.Young boy beaten to death
२६ सप्टेंबरला मालाडच्या मालवणी भागातील जैन मंदिरासमोरील रस्त्याच्या दुभाजकावर एक अज्ञात तरुण जखमी अवस्थेत पडला होता. मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनावेळी मृताच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या.
त्यामुळे या तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला. २६ सप्टेंबरला चंद्रकांत हा परिसरातील राजपूत मार्बलजवळ गेला असता चोर समजून त्याला स्थानिकांनी बेदम मारहाण केली होती.
त्याला जखमी अवस्थेत सोडून आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी केलेल्या तपासात तीन संशयित आरोपींना अटक केली. बोरिवली महानगर न्यायालयाने त्यांना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more