विशेष प्रतिनिधी
मुंबई – राज्यभरात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीस सुरू होऊ शकते, अशी शक्यता राज्य बालरोग टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आली आहे.शहरातील बहुसंख्य लोकांनी कोविड लशीचा पहिला डोस घेतला आहे.Child vaccination starts from Dec.
त्यामुळे आता लहान मुलांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या लशीची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. या वर्षाच्या अखेरीस किमान दोन लशी मुलांसाठी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.’ तसेच लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या तसेच इतर व्याधी असणाऱ्या मुलांना प्राधान्य द्यायला हवे.
कारण अशी मुले संक्रमणाच्या दृष्टीने अधिक संवेदनशील असतात असे तज्ञांनी सांगितले. सध्या झायकोव्ह डी आणि झायडस या दोन लशींचे क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत; तर राज्यात १२ ते १८ वयोगटातील १० लाख मुले आहेत. जे जे रुग्णालयातील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांनीदेखील केंद्र सरकारने तातडीने मुलांसाठी लस आणावी असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App