पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळलो असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनिल पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. The young man committed suicide after being harassed by his wife and mother-in-law
विशेष प्रतिनिधी
पुणे : पत्नी आणि सासूकडून होत असलेल्या छळाला कंटाळलो असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पत्नी आणि सासू विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रोहित सुनिल पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
रश्मी रोहित पवार (वय 26), लता राजेश चव्हाण (वय 46) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित आणि रश्मी यांचे 2016 साली लग्न झाले होते. रश्मी हिची सासू-सासर्यापासून वेगळे राहण्याची इच्छा होती. त्यासाठी रोहितला आग्रह करत होती.त्याने दुसरीकडे बाहेर नोकरी करण्यासाठी देखील ती रोहितला त्रास देत होती. घरातील कोणाशीही त्याने बोलायचे नाही असा तिचा आग्रह असायचा. यावरून त्यांची अनेकदा भांडणे देखील होत होती.
त्यामुळे त्याची सासू लता आणि पत्नी रश्मी या दोघींनी त्याला वारंवार शिवीगाळ व मानसिक त्रास दिला. त्याच्याशी सातत्याने भांडणे केली. या छळाला कंटाळलेल्या रोहित ने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यामध्ये ‘मी माझे जीवाचे बरे वाईट करीत असून त्याला माझी पत्नी व सासू जबाबदार आहेत’ असे देखील नमूद केले आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी हे व्हिडिओ रेकॉर्डिंग ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App