“अतिविद्वान” माध्यमांमध्ये मोदी – शाहांनी लावली “स्पर्धा”; आमच्या मनातला मुख्यमंत्री ओळखून दाखवा!!

chief minister?

 

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊन निकाल लागल्याबरोबर महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण??, याविषयीची अनेक नावे मराठी प्रसार माध्यमांनी रंगवून सादर केली आहेत. यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक आघाडीवरचे नाव देवेंद्र फडणवीस यांचे आहे. नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने अजितदादांचे प्यादे “भावी मुख्यमंत्री” म्हणून पुढे सरकवले आहे.Who will be maharashtra chief minister??

पण या नावांमध्ये फडणवीस यांचे निदान कर्तृत्व तरी तेवढे मोठे आहे. एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचे पक्ष आणि त्यांचे राजकीय कर्तृत्व त्या मनाने खूपच छोटे आहेत. पुरेसे राजकीय कर्तृत्व नसतानाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणे हे राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार अजितदादांचे नाव त्यांच्या समर्थकांनी चर्चा ठेवले आहे.



पण मूळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नाव मुंबईत ठरल्याचा इतिहास आणि वर्तमान नाही. त्यामुळे भविष्य तसे असण्याचे शक्यता नाही. बाकी ठाकरे + पवारांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या कितीही गप्पा मारल्या आणि संजय राऊत यांनी त्यावर रोज पत्रकार परिषदा घेतल्या, तरी महाराष्ट्र मुख्यमंत्री दिल्लीतच ठरतो आणि तो दिल्लीपतीच ठरवतो, ही वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही.

आता देखील “अतिविद्वान” मराठी माध्यमांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी कितीही नावे समोर आणली असली, तरी प्रत्यक्षात जे नाव मोदी आणि शाह यांच्या मनात आहे, तोच नेता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर येऊन बसेल याविषयी शंका नाही. त्यामुळे खरंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी मोदी – शाहांनीच माध्यमांची अप्रत्यक्ष स्पर्धा लावून दिली आहे, ती म्हणजे आमच्या मनातल्या मुख्यमंत्री तुम्ही ओळखून दाखवा!!

 इंदिरा + मोदींचे धक्कातंत्र

एरवी “अतिविद्वान” मराठी माध्यमांचे सोर्सेसच एवढे बळकट नाहीत, की ते शाह किंवा मोदी यांच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि त्यांच्या मनातले नाव हुडकून काढू शकतील. याबाबतीत मोदी आणि शाहांचे थोडे इंदिरा गांधींसारखे आहे. इंदिरा गांधी आपल्या मनातल्या नावाचा कोणालाही ताकास तूर लागू देत नसत. राजकारणातले “धक्कातंत्र” हे इंदिरा गांधींचे कसब होते. त्यामुळे इंदिरा गांधी स्वतःला हवा तो मुख्यमंत्री बसवायच्या किंवा उठवायच्या. तिथे त्या इतरांचे कुणाचे चालू द्यायच्या नाहीत. मोदी आणि शाह यांची कार्यशैली इंदिरा गांधींच्या अतिहुकूमशाही प्रवृत्तीकडे झुकणारी नसली, तरी नाव गुप्त ठेवणे, धक्कातंत्राने एखादी व्यक्ती मोठ्या पदावर बसविणे, याबाबतीत त्यांची इंदिरा गांधींशी समानता आहे.

यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मुलाखतींमधून उघड “हिंट” दिली होती. जी नावे माध्यमांमध्ये चर्चेत आहेत, त्यापैकी कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये चर्चेत नसलेलीच नावे मुख्यमंत्रीपदी बसली, कुठल्याही माध्यमांनी त्यांच्या नावांच्या अटकळी बांधल्या नव्हत्या. पण मोहन यादव, भजनलाल शर्मा, विष्णू देव साय हे मुख्यमंत्री झाले, याकडे विनोद तावडेंनी आवर्जून लक्ष वेधले होते.

पण मराठी माध्यमांनी यातून “हिंट” न घेता जुनीच नावे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत चालू ठेवली आहेत. मोदी आणि शाह यांच्यापर्यंत मराठी माध्यमांचे सोर्सेस नाहीत. ते पोहोचण्याची शक्यताही नाही. त्यामुळेच मराठी माध्यमांना किंवा त्यांच्यातल्या “अतिविद्वान” पत्रकारांना मोदी – शाहांच्या मनातला मुख्यमंत्री हुडकून काढता येण्याची शक्यता दुरापास्त आहे.

Who will be maharashtra chief minister??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात