Ajit Pawar : काका पुतण्याच्या लढाईत पुतण्याच ठरला भारी

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

 Ajit Pawar महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात ही निवडणूक पवार काका पुतण्याची लढाई म्हणून पाहिली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन नेत्यांमध्ये पक्ष विभागला गेला होता. राज्यात शरद पवार गटाने 85 तर अजित
अजित पवार गटाने या निवडणुकीत 53 ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी 41 जागांवर अजित पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. शरद पवार गटाला केवळ 10 जागांवर यश मिळाले. Ajit Pawar

या निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्या उमेदवारांचा 40 ठिकाणी सामना झाला. या 40 जागांचा निकाल काय लागला हे पाहिल्यास अजित पवारांनी शरद पवारांवर मात केल्याचे दिसते.



सर्वात हाय प्रोफाईल लढत बारामती विधानसभा मतदारसंघात होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान उभे केले होते. यामुळे पवार कुटुंबात फूट पडली होती. अजित पवार यांना प्रथमच गावोगावी जाऊन प्रचार सभा घ्याव्या लागल्या. मात्र ही लढाई अजित पवारांनी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने जिंकली.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात तर वडील विरुद्ध मुलगी असा सामना झाला. अजित पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध त्यांच्या शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम असा सामना झाला. अजित पवार गटाचे धर्मरावबाबा आत्राम विजय झाले.

बीड विधानसभेत संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर अशी चुलत भावात लढत झाली. याठिकाणी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला.

या झाल्या नात्यांच्या लढाई. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात काय झाले हे आपण पाहू.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तिय असलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अजित पवार गटाकडून लढत होते. त्यांच्या विरुद्ध शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांचा सामना होता. शरद पवारांनी याठिकाणी सभा घेऊन दिलीप वळसे पाटील यांना पाडा, पाडा, पाडा असे आवाहन केले. अत्यंत अटीतटीच्या लढाईत दिलीप वळसे पाटील यांचा 1200 मतांनी विजयी झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटी नंतर त्यांच्यासोबत राहिलेले एकमेव आमदार अशोक पवार शिरूर मतदार संघातून लढत होते. अजित पवार गटाने माऊली कटके यांना त्यांच्या विरोधात उभे केले होते. मात्र शरद पवार गटात जाण्याची मोठी किंमत अशोक पवार यांना मोजावी लागली. माऊली कटके यांनी त्यांचा 77 हजार मतांनी पराभव केला.
मना झाला. या लढतीत दिलीप वळसे पाटील विजयी झाले.

इंदापुरात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून भाजपातून आलेले हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत झाली. या लढतीत हर्षवर्धन पाटील जिंकतील असा दावा केला जात होता. पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला.

जुन्नरमध्ये अजित पवार गटाचे अतुल बेनके यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सत्यशील शेरकर यांच्यात सामना झाला. पण या मतदारसंघात दोन्ही गटाच्या उमेदवारांचा विजय झाला नाही. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार शरद सोनवणे यांचा विजय झाला.

पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत झाली. यात अण्णा बनसोडे यांचा विजय झाला.

वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे यांच्याविरोधात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. भाजपमधून शरद पवार यांच्याकडे आलेले बापूसाहेब पठारे विजयी झाले.

पिंपरीत अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यात लढत झाली. यात अण्णा बनसोडे यांचा विजय झाला.

हडपसर मतदारसंघात अजित पवार गटाचे चेतन तुपे विरुद्ध शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. या लढतीत चेतन तुपे यांचा विजयी झाला.

अणुशक्ती नगरमध्ये अजित पवार गटाच्या सना मलिक यांची शरद पवार गटाचे फहाद अहमद यांच्या विरोधात लढत झाली. फहाद अहमद हे प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत. या मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत सना मलिक यांचा विजय झाला.

श्रीवर्धनमध्ये अजित पवार गटाच्या आदिती तटकरे विरुद्ध शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांच्यात सामना झाला. या सामान्यात आदिती तटकरे या भरघोस मतांनी विजयी झाल्या.

अकोलेत किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे यांच्यात लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे किरण लहामटे यांचा विजय झाला.

कोपरगावात आशुतोष काळेंविरोधात संदीप वर्पे यांच्यात सामना झाला. यामध्ये अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांचा विजय झाला.

पारनेरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्यात लढत झाली. राणी लंके या खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी आहेत. या निवडणुकीत काशीनाथ दाते यांचा विजय झाला आहे.

अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात सामना झाला. संग्राम जगताप येथून विजयी. झाले.

माजलगावात प्रकाश सोळंकेंविरोधात मोहन जगताप लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके यांचा विजय झाला.

आष्टीत शरद पवार गटाचे मेहबूब शेख विरुद्ध अजित पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब आजबे यांच्यात लढत झाली. इथे भाजपकडून सुरशे धस मैदानात होते. या निवडणुकीत सुरेश धस यांचाच विजय झाला.

परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख यांच्याक लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे धनंजय मुंडे विजयी झाले.

अहमदपुरात बाबासाहेब पाटलांविरोधात विनायक जाधव लढत झाली. यामध्ये अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील यांचा विजय झाला.

उदगीरमध्ये संजय बनसोडेंविरोधात सुधाकर भालेराव लढतीत अजित पवार गटाचे संजय बनसोडे विजयी.

माढामध्ये अभिजीत पाटील विरुद्ध मीनल साठे लढत झाली. शरद पवार गटाचे अभिजीत पाटील विजयी झाले.

मोहोळमध्ये यशवंत मानेंविरोधात राजू खरे या लढतीत शरद पवार गटाचे राजू खरे विजयी झाले.

फलटण विधानसभेत दीपक चव्हाण विरुद्ध सचिन पाटील असा सामना झाला . अजित पवार गटाचे सचिन पाटील विजयी झाले.

वाईमध्ये मकरंद पाटलांविरोधात अरुणादेवी पिसाळ अशी लढत झाली. अजित पवार गटाचे मकरंद पाटील विजयी झाले.

चिपळूणमध्ये शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव सामन्यात अजित पवार गटाचे शेखर निकम विजयी झाले.

चंदगड मतदारसंघात अजित पवार गटाचे राजेश पाटील विरुद्ध शरद पवार गटाच्या नंदिता बाभूळकर आणि अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या लढतीत अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील विजयी झाले.

कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे सामन्यात अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विजयी झाले.

इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विजय मिळविला.

तासगावात माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या विरुद्ध अजित पवार गटाकडून संजयकाका पाटील यांनी आव्हान उभे केले होते. येथे शरद पवार गटाचे रोहित पाटील विजयी झाले.

सिंदखेडराजा आमदार राजेंद्र शिंगणे विरुद्ध मनोज कायंदे अशी लढत झाली. अजित पवार गटाचे मनोज कायंदे विजयी झाले.

मोर्शीत अजित पवार गटाचे देवेंद्र भुयार विरुद्ध शरद पवार गटाचे गिरीश कराळे आणि भाजपचे उमेश यावलकर यांच्यात लढत झाली. यामध्ये यावलकर यांचा विजय झाला.

तुमसरमध्ये राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे सामन्यात अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विजयी झाले.

पुसद मतदारसंघात इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद असा सामना झाला. अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक विजयी

वसमत विधानसभेत राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर लढतीत अजित पवार गटाचे राजू नवघरे विजयी झाले.

येवल्यात छगन भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे यांनी आव्हान उभे केले होते. यामध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ विजयी झाले.

सिन्नर माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे लढतीत अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे विजयी झाले.

दिंडोरी- नरहरी झिरवळ विरुद्द सुनीता चारोसकर या सामन्यात अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ विजयी झाले.

शहापुरात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा या लढतीत अजित पवार गटाचे दौलत दरोडा यांनी विजय मिळविला.

मुंब्रा कळव्यात माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांचीच एकेकाचे निकटचे सहकारी नजीब मुल्ला यांनी निवडणूक लढविली. यात जितेंद्र आव्हाड विजयी झाले.

The Battle of Uncle vs. Nephew: The Nephew Emerges Victorious

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात