भाजपने ३१ वर्षांनंतर समाजवादी पार्टीची धुरा मोडून भगवा फडवकला
विशेष प्रतिनिधी
पाटणा : BJP उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीच्या ९ जागांचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत भाजपने ७ जागा जिंकल्या आहेत, आरएलडीने एक आणि समाजवादी पक्षाने २ जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत कुंडरकी जागेची सर्वाधिक चर्चा होत असली तरी, या जागेवर भाजपने सपाचा धुव्वा उडवत ३१ वर्षानंतर विजयाची पताका फडकवली आहे.BJP
पश्चिम यूपीच्या मुस्लिमबहुल भागातील या जागेवर भाजपचे उमेदवार रामवीर सिंह यांनी एकूण मतांपैकी तीन चतुर्थांश मते मिळवली आणि उर्वरित ११ उमेदवार केवळ एक चतुर्थांश मतांपर्यंत मर्यादित राहिले. भाजपचे उमेदवार रामवीर सिंह यांनी तीन वेळा आमदार राहिलेले सपा उमेदवार हाजी रिझवान यांचा १४४७९१ मतांनी पराभव केला आहे. एवढा मोठा विजय पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
कुंडरकी जागेवर सिं११ मुस्लिम उमेदवार होते आणि रामवीर ह हे एकमेव हिंदू होते. कुंदरकीमध्ये भाजपने असा खेळ केला की ही जागा ३१ वर्षांनंतर जिंकली. भाजपचे उमेदवार रामवीर सिंह हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते आणि त्यांनी ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि त्यांनी १७०३७१ मते मिळवून विजय मिळवला. रामवीर सिंह यांच्या विजयाचे अंतर १४४७९१ इतके होते जे खूप जास्त आहे.
कुंडरकी पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयाची सर्वत्र चर्चा आहे, कुंडरकी हा सपाचा बालेकिल्ला मानला जातो मात्र त्यात भाजपने मुसंडी मारून सर्वांनाच हैराण केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान, भाजपचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर हे जाळीदार टोपी आणि अरबी रुमाल घालून मुस्लिम मेळाव्यात मते मागताना दिसले. याशिवाय भाजपचे मुस्लीम नेतेही कुंडरकी येथे तळ ठोकून घरोघरी जाऊन मते मागत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App