विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाला.
शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे .उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे. कारचा चेंदामेंदा झाला. उर्मिला कानेटकर ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ती महेश कोठारे यांची सून असून आदिनाथ कोठारेची पत्नी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App