विशेष प्रतिनिधी
नागपूर : लिंबापेक्षा आकाराने मोठी आणि संत्र्यापेक्षा लहान, असे मोसंबीचे रूप असले तरी आता नव्या कलमांतून आणि नव्या संशोधनातून मोसंबीच्या फळांचा आकार आणि गोडवाही वाढला आहे. निर्यातीच्या दृष्टीने संत्र्याएवढीच आता मोसंबीलाही मागणी येत असल्याने शेतकऱ्यांचा कल मोसंबी लागवडीकडे वाढला आहे.To the fruit market in Nagpur The glitter brought by the citrus
नागपूरची संत्री प्रसिद्ध आहेत. दूरपर्यंत त्याची ख्याती आहे. नागपुरी संत्र्यांचा गोडवा कायम असतानाच आता शेतकरी मोसंबीकडेही वळला आहे. या लिंबूवर्गीय पिकाकडे मागील काही काळात शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेली फळगळ शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पाडणारी ठरली आहे.
नागपूरच्या कळमना मार्केट मध्ये रोज ८० ते १०० टेम्पो घेऊन मोसंबी विकायला शेतकरी येतात मार्केट मधे व्यापारी असे सांगतात की मोसंबी चा भाव १८ ते २३ रुपये आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App