विशेष प्रतिनिधी
सांगली : Eknath Shinde उठाव केल्यानंतर माझ्यावर दररोज आरोप झाले, पण मी आरोपांना उत्तर न देता कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने या कामांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि महायुतीला २३२ जागा मिळाल्या,ही शिवसेना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, टोमणेसम्राटांची मारणाऱ्यांची नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.Eknath Shinde
सांगली जिल्ह्यातील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले, “चंद्रहार पाटील यांनी खऱ्या आखाड्यात प्रवेश केला आहे. ते एका कुटिल प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून एका स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. मी जरी पैलवान नसलो, तरी २०२२ मध्ये मी राजकारणाच्या आखाड्यात डावपेच टाकून विरोधकांना चारीमुंड्या चित केलं आणि त्यातून आजही ते उठलेले नाहीत!”
ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांना ‘सवंगडी’ मानायचे, मालक नाही. पण त्यांच्या पश्चात काहींनी अहंकारापोटी सहकाऱ्यांना ‘घरगडी’ समजायला सुरुवात केली. म्हणूनच आज शिवसेनेत सच्च्या कार्यकर्त्यांना बळ मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना उभी आहे.”
पाकिस्तानवर जोरदार हल्ला करत शिंदे म्हणाले, “पहलगाममध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम पाकिस्तानने केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे आपण पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. देशभरातील शिष्टमंडळांपैकी एकाचं नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलं. चंद्रहार पाटील यांनी सीमेवरील जवानांसाठी दिल्लीसह काश्मीरमध्येही रक्तदान शिबिर घेण्याचा संकल्प केला आहे. हेच त्यांचं राष्ट्रभक्तीचं दर्शन आहे.
लोकांच्या मनात ओढ निर्माण होण्याचं कारण म्हणजे आम्ही दिलेला शब्द पाळतो. राज्यात सर्वसामान्यांचं सरकार आणलं, आणि गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलो. हेच आमचं बलस्थान आहे, असेही शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App