कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायलाही पगार नसल्याने पुढील आदेशापर्यंत मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी बंद राहणार आहे. पुरेसा पैसा नसल्याने तसेच या हॉटेलचा सद्य स्थितीत व्यवसाय नसल्याने होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि. या कंपनीने म्हटले आहे.There is no money to pay the salaries of the employees, the five star hotel Hyatt Regency in Mumbai is closed
प्रतिनिधी
मुंबई : कर्मचाऱ्यांचे पैसे द्यायलाही पगार नसल्याने पुढील आदेशापर्यंत मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हयात रिजेन्सी बंद राहणार आहे. पुरेसा पैसा नसल्याने तसेच या हॉटेलचा सद्य स्थितीत व्यवसाय नसल्याने होत नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचे पगार देऊ शकत नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि. या कंपनीने म्हटले आहे.
हयात रिजेन्सी ही अमेरिकन हॉस्पिटॅलिटी कंपनी आहे. याची मुंबईतील प्रॉपर्टी हयात रिजन्सी ही अशियन हॉटेल्स (वेस्ट) लि.च्या अंतर्गत चालविण्यात येत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हे हॉटेल आहे.
पुढील आदेशापर्यंत हॉटेल बंद असल्याकारणाने येथे कुठल्याही प्रकारचे बुकिंग स्विकारले जाणार नाही. तसेच गेल्या वषीर्पासून येथे येणा-या ग्राहकांची संख्या रोडावल्याने या हॉटेलचा फारसा व्यवसाय होत नव्हता.
परिणामी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही कंपनीकडे पुरेसा पैसा नसल्याने हे हॉटेल तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे असे हॉटेल व्यवस्थापन अधिका-यांनी सांगितले आहे. हॉटेल एकाएकी बंद झाल्याने येथील काम करणारे कर्मचारी बेरोजगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App