तापसी, अनुराग कश्यप यांची पुण्यातील पंचतारांकित हॉटेलात प्राप्तिकर विभागाकडून चौकशी


विशेष प्रतिनिधी

पुणे : फॅन्टम फिल्म कंपनीच्या तब्बल 650 कोटी रुपयांच्या करचुकवेगिरी प्रकरणामध्ये बुधवारी सकाळपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी सुरू आहे. चौकशी शुक्रवारी देखील सुरू राहणार असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. Tapsi Pannu Anurag Kashyap introgesion in Pune

प्राप्तिकर विभागाच्या मुंबईच्या ‘इन्व्हेस्टीगेशन टीम’ ने बुधवारी सकाळीच फॅन्टम फिल्म कंपनीशी संबंधित मुंबई, पुण्यासह विविध ठिकाणांवर छापेमारी सुरू केली होती. अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या आगामी ‘दोबारा’ या सिनेमाचे पुण्याच्या जवळ चित्रीकरण सुरू आहे. त्यांचा मागील चार पाच दिवसांपासून हिंजवडी परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलमध्येच त्यांना गाठत चौकशी करण्यास सुरुवात केली. या दोघांसोबत आणखीही तीन चार जण सोबत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.या चौकशीदरम्यान कोणालाही बाहेर सोडण्यात येत नव्हते. हॉटेल प्रशासनालाही सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या. याबाबत हॉटेल प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी कश्यप आणि तापसी यांचा मुक्काम हॉटेलमध्ये असल्याची माहितीच नाकारली. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारीही दोघांची चौकशी होण्याची शक्यता असून मुंबई, पुणे आणि दिल्लीत करण्यात आलेल्या छापेमारी आणि चौकशीमध्ये जवळपास सव्वाशे अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Tapsi Pannu Anurag Kashyap introgesion in Pune

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी