मराठा आरक्षण रद्द केल्याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना, मात्र मुख्यमंत्री याबाबत बोललेच नाहीत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा सर्वांत मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रातील विविध टप्प्यांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसणार आहे.The students were most affected by the cancellation of Maratha reservation, but the Chief Minister did not speak about it

मात्र, यावरून आता राजकारण सुरू करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांबाबत शब्दही काढला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारबद्दल संताप व्यक्त होत आहे.मागील वर्षी मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे अकरावी, अभियांत्रिकी, पदवी प्रवेश, आयटीआय प्रवेश अशा सर्व प्रवेश प्रक्रियांना खीळ बसली होती; मात्र आर्थिक मागास प्रवगार्तून (ईडब्ल्यूएस) प्रवेश देऊन या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला.

तरीही सामाजिक, शैक्षणिक मागास वगार्तून (एसईबीसी) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. ईडब्ल्यूएसमधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीही जागा कमी झाल्याने याबद्दल नापसंती दर्शविली.

आता आरक्षणच रद्द करण्यात आल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थ्यांचा निभाव कसा लागणार? गुणवत्ता असूनही आयटीआय, अभियांत्रिकी आणि नामांकित महाविद्यालयातील प्रवेशापासून त्यांना दूरच राहावे लागणार, असे विद्यार्थी म्हणत आहेत.

गेले अनेक महिने आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससी परीक्षांचे निकाल आणि पदभरतीमधील नियुक्तया रोखून ठेवण्यात आल्या आहेत. आरक्षणाअभावी अनेक उमेदवारांच्या नियुक्तया गेल्या २ वर्षांपासून रखडल्या त्यांनी आता काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.3

राज्यातील कोणत्याही मंत्र्याने याबाबत विद्यार्थ्यांना किमान दिलासा देणे अपेक्षित असताना यावर अवाक्षरही काढले नाही, अशी टीका विद्यार्थ्यांकडून होत आहे.

The students were most affected by the cancellation of Maratha reservation, but the Chief Minister did not speak about it

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात