भारतीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्याकडून आदर्श घ्या असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भडकले. भारताच्या राजदूतांकडून काहीतरी शिका, असे म्हणत इम्रान खान यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.Take the example of Indian officials, Imran Khan lashes at Palistani officials
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : भारतीय अधिकाऱ्यां च्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्याकडून आदर्श घ्या असे म्हणत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भडकले. भारताच्या राजदूतांकडून काहीतरी शिका, असे म्हणत इम्रान खान यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
इम्रान खान यांनी जगभरातील देशांमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या राजदूतांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. पाकिस्तानच्या राजदूतांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करताना इम्रान खान म्हणाले, भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग अधिक सक्रिय असतो.
त्यांच्याकडून परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांना उत्तम सेवा दिली जाते. पाकिस्तानचे राजदूत त्यांच्या कामाबद्दल उदासीन असतात. त्यामुळे विशेष करून मध्य पूवेर्तील सेवांवर परिणाम होतो.
इम्रान खान म्हणाले, सौदी अरेबियामध्ये असलेल्या दूतावासातील काही कर्मचारी काम करत नसल्याची माहिती मला मिळाली आहे. कुवेतमध्ये असलेल्या नाड्राच्या (नॅशनल डेटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरटी) कार्यालयात तैनात असलेले कर्मचारी मार्गदर्शन करण्याऐवजी हफ्ते खातात.
इथला एक अधिकारी बोगस कागदपत्रं तयार करण्याचं काम करतो असंदेखील मला समजलं आहे. हे ऐकून मला धक्काच बसला.भारतीय राजदूत आपल्या नागरिकांना अतिशय उत्तम दजार्ची सेवा देतात.
इतकंच नव्हे, तर त्यांच्या देशात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्याकडून काहीतरी शिका, असा सल्लाही त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App